Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार थोडक्यात बचावले…छठघाट पाहणी दरम्यान घडली घटना...

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार थोडक्यात बचावले…छठघाट पाहणी दरम्यान घडली घटना…

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याची घटना आज घडली आहे.मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी मंत्री आणि इतर पदाधिकाऱ्यांसह छट घाटाची पाहणी करत असताना थोडक्यात बचावले. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्र्यांची बोट जेपी सेतूच्या खांबाला धडकली. जलसंपदा मंत्री संजय झा यांच्याशिवाय आयएएस अधिकारी प्रत्याया अमृत, आनंद किशोर यांच्यासह अनेक अधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.

एएनआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील सर्व लोक सुरक्षित आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सर्व अधिकारी दुसऱ्या स्टीमरमधून बाहेर पडले. त्याच्यासोबत एक स्टीमर बोटही धावत होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: