Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीरामटेक | दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, तिन दिवसांचा पीसीआर...

रामटेक | दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या, तिन दिवसांचा पीसीआर…

रामटेक – राजू कापसे

दुचाकी चोरणाऱ्या तिन आरोपींच्या टोळीला रामटेक पोलिसांनी अटक केलेली असुन त्यांच्याकडून रोख रक्कम व दुचाकी जप्त करून तिन दिवसांचा पी सी आर घेतलेला आहे. पी.सी.आर. मध्ये आणखी काही निष्पन्न होण्याचे भाकीत व्यक्त केल्या जात आहे.

अटक एकूण आलेल्या आरोपींमध्ये करण रोशन पाटील वय 24 वर्ष रा.भीमसेना नगर,जरीपटका नागपूर, कृष्णा शिवा बागडे वय 35 वर्ष राहणार चांदोरी ता.जि.भंडारा, अविष्कार मेश्राम वय 24 वर्ष रा.चांदोरी ता.जि. भंडारा यांचा समावेश आहे. आरोपींकडून नगदी १६००/- रु.तसेच बजाज पल्सर १८० किंमत ६००००/- रु. तसेच मोपेड गाडी किमती ४००००/- रु.असा एकूण १०१६००/- रु. चा माल वसूल करण्यात आला.

तसेच आरोपिताचा ३ दिवस पोलिस कोठडी रीमाड मिळाल्याने उर्वरित माल वसूल करण्यात येईल अशी माहीती पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार यांनी माहीती देताना सांगितले.

सदरची कारवाई ही पो.उ.प.नि.श्रीकांत लांजेवार,पो.ना.मंगेश सोनटक्के, पो.ना अमोल इंगोले,पो.ना.प्रफुल रंधई,पो.शि.शरद गीते,पो. शि. धीरज खंते डीबी पथक पोलीस स्टेशन रामटेक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आशीत कांबळे, पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: