Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsमोठी बातमी | शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र...

मोठी बातमी | शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र…

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे याचं पाठबळ वाढत असल्याचे चित्र आता सध्या राज्यात दिसत आहे. एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हे एकत्र येत हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आल्याची काम करणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षांनी म्हटले आहे. प्रादेशिक संपूण टाकण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, मात्र न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा विषय नाही, हा लोकशाहीच्या भवितव्याचा विषय आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती देखील नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: