Sunday, December 8, 2024
HomeBreaking Newsमोठी बातमी | प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणार...कॉंग्रेसची 'हि' विनंती आंबेडकरांना...

मोठी बातमी | प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणार…कॉंग्रेसची ‘हि’ विनंती आंबेडकरांना मान्य…

न्यूज डेस्क : महाविकास आघाडीच्या बैठकीचं नाना पटोले यांच्या सहीचे पत्र आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यावर प्रतिक्रिया देणारे पत्र पाठवलं. ते पत्र पाठवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा फोन आला. कॉन्फरन्स कॉलवर त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीथला यांच्याशी बाळासाहेब आंबेडकरांचे बोलणं करून दिलं. त्यावरती बोलताना रमेश चेनीथला यांनी सांगितलं की महाराष्ट्रात यासंदर्भात बोलणी करण्याचे अधिकार काँग्रेसने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोन काँग्रेसच्या नेत्यांकडे दिलेले आहेत. आणि पुढच्या वेळेला महाविकास आघाडीची जी बैठक होईल त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांनी सहभागी व्हावं अशी विनंती त्यांनी केली. रमेश चेनीथला यांची ही विनंती बाळासाहेब आंबेडकर यांनी मान्य केली आहे, मात्र ती मान्य करतानाच बाळासाहेबांनी रमेश चेनीथला यांना महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक परिस्थिती जी आहे त्याबद्दल अवगत करून दिलं.

सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि मराठा बांधवांचा प्रश्न हा पेटलेला आहे. जरांगेचा आंदोलन असेल किंवा गरीब मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल यासंदर्भात रास्त आणि योग्य भूमिका घेणे आवश्यक असल्याच बाळासाहेबांनी सांगितलं. रमेश चेनीथला यांनी सुद्धा ते मान्य केलं, की हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपण त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याच वेळेला बाळासाहेबांनी हेही सांगितलं की ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठ्यांचा आत्ताचा पेटलेला प्रश्न असेल या संदर्भामध्ये काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा तसा थेट संबंध आला नाही मात्र आम्ही त्या आंदोलनात सुरुवातीपासून आहोत, हा प्रश्न आमच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे हा प्रश्न आणि या संदर्भातील भूमिका स्पष्ट केल्यावरच आपल्याला पुढे जाता येईल, त्याशिवाय या ठिकाणी महाराष्ट्रातलं राजकारण करता येणार नाही. रमेश चेनीथला यांनी हेही मान्य केलं आहे. आगामी बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल असं बाळासाहेबांनी सांगितलं आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: