सिक्कीममधून एक मोठी वाईट बातमी समोर आलीय, येथे लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात झाला आहे. लष्कारांना घेवून जाणारा ट्रक दरीत पडला असल्याने लष्कराचे 16 जवान शहीद झाले आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सिक्कीममधील गेमा येथे ही घटना घडली. अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्याचा एक भाग होते, जे सकाळी चाटणहून थांगूच्या दिशेने निघाले होते.
पीआरओ डिफेन्स लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांच्या म्हणण्यानुसार, जेमाच्या वाटेवर एका तीव्र वळणावर वाहन उतारावरून घसरले आणि खाली पडले. तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आलीदरीत कोसळलेल्या ४ जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेत तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ जवानांचा मृत्यू झाला आहे, असं भारतीय लष्कराकडून निवेदन जारी करत सांगितलं आहे. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीममध्ये झालेल्या रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या शूर जवानांच्या हौतात्म्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. राष्ट्रपती म्हणाल्या की, मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पीएम म्हणाले की, शोकाकुल कुटुंबियांच्या संवेदना. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.