Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीपातुर शहरातील शिवनेरी कॉलनीत मोठी घरफोडी, चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज केला लंपास...

पातुर शहरातील शिवनेरी कॉलनीत मोठी घरफोडी, चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज केला लंपास…

सोन्याचे दागिने व चांदी सह मुद्देमाल गेला चोरीस

पातुर – निशांत गवई

पातुर शहरातील शिवनेरी कॉलनी परिसरात जबरी घरफोडी करून तीन लाखाच्या सोन्याच्या दागिन्यासह चाळीस हजार नगदी रोख रक्कम लंपास केल्याने खळबळ उडाली.

पातुर शहरातील शिवनेरी कॉलनी मध्ये राहणारे धम्मानंद लक्ष्मण वानखडे यांच्या घरामध्ये 17 जून रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरी कोणी नसताना संधीचा फायदा घेऊन घरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात ठेवलेले सोन्याची दागिने, सोन्याची लंबी पोत, सेवन पीस ,सोन्याचे नेकलेस, लहान मुलांची दागिने ,चांदी असा एकूण अंदाजे अडीच ते तीन लाखाचा ऐवज व घरात ठेवलेले नगदी चाळीस हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

दुसऱ्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप फुटलेले दिसल्याने घर मालकाला चोरी झाल्याचे लक्षात आले त्यामुळे घरमालकाने चोरीची माहिती पातुर पोलिसांना दिली चोरीची माहिती पातुर पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी ठाणेदार हरीश गवळी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन घराची पाहणी केली.

घर मालकाच्या तक्रारीनंतर पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत. पातुर शहरात गेल्या काही दिवसानंतर पाहिल्यादा एवढी मोठी चोरीची घटना घडल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: