Wednesday, January 8, 2025
HomeMarathi News TodayBIG B Birthday Special | अमिताभ-रेखाची प्रेमकहाणी…जया यांच्या 'या' शब्दामुळे…

BIG B Birthday Special | अमिताभ-रेखाची प्रेमकहाणी…जया यांच्या ‘या’ शब्दामुळे…

BIG B Birthday Special : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस असल्याने सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना ब्युटी क्वीन रेखा यांच्या लव्हस्टोरीबद्दलची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. फिल्मी दुनियेत जेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीला बॉलीवूडचे सर्वात हॉट कपल म्हटले जात होते आणि त्यांच्या प्रेमकथांच्या चर्चा लोकांच्या ओठावर होत्या. दोघांचे छुपे प्रेम होते असे सांगितले जाते.

त्यांच्या जोडीने पडद्यावर एकापेक्षा एक चित्रपट दिले. कामादरम्यान दोघांमधील जवळीक वाढली होती. अमिताभ यांनी रेखावरील त्यांचे प्रेम कधीच मान्य केले नाही, पण रेखा आजही त्यांना मनापासून आपले मानते. चला तर मग, अमिताभ यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ‘बॉलिवुडचा शहेनशाह, 80 वर्षे निमित्य अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमकथेबद्दल जाणून घेवूया…

अमिताभ बच्चन आणि रेखा यांची चित्रपटगीते ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. असं म्हणतात की, रेखा आणि अमिताभ यांच्यात प्रेमाची ठिणगी पेटली होती, त्याच दरम्यान रेखा बॉलिवूडचे दिग्गज ऋषी कपूर यांची पत्नी आणि तिची जवळची मैत्रिण नीतू सिंह यांच्या लग्नाला सिंदूर परिधान करून आणि मंगळसूत्र परिधान करून पोहोचली. त्यानंतर रेखाने अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केल्याची अफवा मीडियामध्ये पसरली होती. मात्र, अनेक अफवांनंतर रेखाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘त्या संध्याकाळी ती शूटिंग सेटवरून थेट कार्यक्रमाला पोहोचली होती. सिंदूर आणि मंगळसूत्र तिच्या पात्राचा भाग होता आणि ती काढायला विसरली.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी 1976 मध्ये आलेल्या ‘दो अंजाने’ चित्रपटादरम्यान एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. गंगा की सौगंध चित्रपटाच्या सेटवर रेखासोबत गैरवर्तन केल्यावर अमिताभने आपल्या वरील नियंत्रण गमावले होते तेव्हा लोकांना त्यांच्या रील लाइफ केमिस्ट्रीची कल्पना आली. त्यानंतर या दोघांबद्दलच्या अफवांनी चर्चेत आली. मात्र, अमिताभ आणि रेखा यांनी हे सत्य कधीच जाहीरपणे मान्य केले नाही. सिलसिला चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांनी दोघांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता.

एका मुलाखतीदरम्यान रेखाने तिच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली की मला काय हवे आहे याची कोणीही पर्वा करत नाही. मी दुसरी स्त्री नाही. समोरची व्यक्ती सर्वांच्या नजरेत गरीबच राहते, असा टोलाही त्यांनी नाव न घेता जया यांच्यावर निशाणा साधला. दुसऱ्यावर प्रेम आहे हे माहीत असताना अशा माणसासोबत एका छताखाली कसे राहता येईल.

त्यांच्या अफेअरच्या बातम्या आगीसारख्या पसरत असतानाही अमिताभ बच्चन शांत होते. पण या बातम्या जयाच्या कानापर्यंत पोहोचल्या होत्या. एकदा अमिताभ बच्चन घरी नसताना जया यांनी रेखाला रात्री जेवायला बोलावले. मग रेखाला वाटले की कदाचित तीच्यावर रागावणार. पण रेखा जेव्हा जयाच्या घरी पोहोचली तेव्हा तिने रेखाला खूप आदराने वागवले, खाऊ घातले आणि घर दाखवले. रेखा जेव्हा परत जात होती, तेव्हा जया तिला म्हणाली की ‘मी अमितला कधीही सोडणार नाही’. रेखा कधीच अमिताभची होणार नाही, असे जया यांना म्हणायचं होत…

अमिताभ आणि रेखा यांनी शेवटचा ‘सिलसिला’ चित्रपट एकत्र केला होता. त्यानंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत. ‘सिलसिला’ हा चित्रपट अमिताभ, रेखा आणि जया यांची खरी जीवनकथा असल्याचेही लोक म्हणतात. या चित्रपटानंतर अमिताभ आणि रेखा यांच्यात अंतर निर्माण झाले. आजही जेव्हा जेव्हा दोघींना एकत्र पाहिले जाते तेव्हा ते एकमेकांपासून नजर चोरत असतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: