Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsगंगोत्री महामार्गावर मोठी दुर्घटना...३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत पडली...सहा मृतदेह बाहेर...

गंगोत्री महामार्गावर मोठी दुर्घटना…३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत पडली…सहा मृतदेह बाहेर…

न्युज डेस्क : उत्तराखंडमध्ये रविवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. गंगोत्री महामार्गावर गंगनानीजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या अपघातात 27 जखमींना वाचवण्यात यश आले आहे. एक जण बेपत्ता असून एक जण बसमध्ये अडकला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक (uk 07 8585) 33 प्रवाशांसह गंगोत्रीहून उत्तरकाशीच्या दिशेने येत होता. यादरम्यान बस अनियंत्रित होऊन दरीत पडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानुसार आतापर्यंत २७ जखमींना वाचवण्यात यश आले आहे.

जखमींना १०८ रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एसपी अर्पण यदुवंशीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्याचवेळी जिल्हा रुग्णालयातून आणखी दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: