Saturday, September 7, 2024
spot_img
Homeमनोरंजनघरत गणपती चित्रपटात भूषण निकिताची जोडी जमली...

घरत गणपती चित्रपटात भूषण निकिताची जोडी जमली…

मुंबई – गणेश तळेकर

चित्रपटातल्या नव्या जोड्यांची चर्चा नेहमी होत असते.एखादी नवी जोडी येणार असेल तर प्रेक्षकही त्या जोडीची उत्सुकतेने वाट पाहतात. भूषण प्रधान, निकिता दत्ता ही अशीच एक नवी जोडी ‘घरत गणपती’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. येत्या २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’ हा भव्य मराठी चित्रपट नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

केतन आणि क्रिती अशी या दोघांच्या व्यक्तिरेखेची नाव आहेत. आम्ही नेहमीच आशयसंपन्न भूमिकांना प्राधान्य दिलं असल्याने या भूमिकेबद्दल विचारल्यानंतर आमच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब होती. नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा हा चित्रपट असून ‘फ्रेश जोडी’ ही या चित्रपटाची गरज होती.त्यानुसार या चित्रपटासाठी आमची निवड झाली. एकत्र काम करताना मजा आली. प्रेक्षकांनाही चित्रपटात आमचा हा जुळलेला सूर नक्कीच दिसेल. तसेच अनुभवी कलाकारांबरोबर काम करताना आम्हाला खूप काही शिकायला मिळालं.

या दोघांसोबत अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत. गणपती उत्सवाच्या आनंददायी सोहळ्याचं आणि घरत कुटुंबातील नात्यांच्या बंधाची गोष्ट घेऊन ‘घरत गणपती’ हा चित्रपट येत्या २६ जुलैला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

पॅनोरमा स्टुडिओज सविनय सादर करत आहेत नॅविअन्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘घरत गणपती’. नॅविअन्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाच्या वर्ल्ड वाइड वितरणाची जबाबदारी पॅनोरमा स्टुडिओजने सांभाळली आहे तसेच चित्रपटाच्या म्युझिकची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: