अकोट – चंडिकापूर येथे राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल.. हर घर जल..! पाईपलाईन कामाचे भूमिपूजन शुक्रवारी पार पडले. चंडिकापूर ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रमिला अढाऊ यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले.
भुमिपुजन कार्यक्रमासाठी उपसरपंच राजकुमार खंडेराव,माजी उपसरपंच तुषार अढाऊ, ग्रामपंचायत सदस्य सौ प्रीती लोखंडे, मंगेश चव्हाण, अनिल नितोने ,मनीषा जवंजाळ सौ पूजा नितोने व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रमोद अढाऊ, श्रीकृष्ण चौधरी सतीश अढाऊ, बापूराव अढाऊ, संत सावता माळी परिषदेचे तालुका अध्यक्ष महेश वाशिमकार जि.प.परिषद शिक्षक भरणे आदींची उपस्थिती लाभली होती.यावेळी माजी उपसरपंच तथा अमृत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार अढाऊ यांनी उपस्थितांचे व सर्वांचे आभार मानले.