रामटेक – राजु कापसे
ग्राम पंचायत तारसा येथे दि.०४ मार्च २०२४ ला आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते २४ कोटी ६० लक्ष रुपयाचे भूमिपूजन करण्यात आले. यात १) कन्हान तारसा सांड नदीवरील पूल बांधकाम रु.१५ कोटी २) तारसा ते हिंगणा रस्त्याचे बांधकाम रु.२ कोटी ३)तारसा ते बानोर रस्त्याचे बांधकाम रु.२ कोटी
४) तारसा ते आष्टी रस्त्याचे बांधकाम रु.२ कोटी ५) तारसा ते नवेगाव रस्त्याचे बांधकाम रु.२ कोटी रुपये. ६) तारसा गावांतर्गत सिमेंट रस्ते व नाली बांधकाम करणे रु.१ कोटी ७) सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉक बसविणे रु.२५ लक्ष ८) आमदार निधी अंतर्गत स्वर्ग रथ रु.१५ लक्ष ९) परमात्मा एक भवन येथे सभामंडप रु.१० लक्ष १०) तारसा जॉईंट अंतर्गत ओपन प्लेस येथे कंपाउंड वॉल रु.१० लक्ष असे एकूण २४ कोटी ६० लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी उपस्थित मा.महिला व बालकल्याण सभापती जि. प.नागपूर श्रीमती.नंदाताई लोहबरे, सरपंचा सौ.वैशालीताई लेंडे, उपसरपंच श्री.चंद्रशेखरजी गभने, श्री.शुभम गिरडकर, मा.सरपंच श्री.फुलचंदजी पिसे, मौदा शिवसेना तालुकाप्रमुख श्री.प्रशांत भुरे, सदस्य श्री.शुभम गभने, श्री.जनार्दन येळने, सौ.नलिनीताई राऊत, सौ.दुर्गाताई येळने,
सौ.पल्लवीताई मोटघरे, सौ.किरणताई डांगरे, सौ.प्रियंकाताई डांगरे, सौ.संगीताताई डहाके, सौ.पुष्पाताई बिघाने, सौ.रंजनाताई पिसे , सौ.मंजुषाताई गभने, श्री.प्रभूजी ढोबळे, श्री.चंद्रभानजी येळणे, श्री.कृष्णाजी मोटघरे,
श्री.निलेशजी भोले, श्री.विजय पिसे, श्री.जयदेव पिसे, श्री.सुधाकरजी ठोसरे, श्री.ताराचंदजी वंजारी, श्री.राहुल सोमनाथे, श्री.शेखर गभने, श्री.मयूर हटवार, श्री.आदित्य सोमनाथे, श्री.विकास गभने, श्री.कार्तिक गिरडकर, श्री.संकेत येळणे व सर्व गावकरी नागरिक उपस्थित होते.