Monday, December 23, 2024
Homeसामाजिकरामटेक शहरात भुजलिया सन उत्साहात साजरा...

रामटेक शहरात भुजलिया सन उत्साहात साजरा…

राजु कापसे
रामटेक

काल दिनांक ३१ ऑगस्ट रोज गुरुवारला रामटेक येथे कहार, लोधी, किराड, चर्मकार, सुदर्शन, समाजाचा वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भुजलिया काढण्यात आली. या शोभायात्रा व रैलीची सुरुवात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांचे शुभहस्ते माजी खासदार स्व. जातीरामजी बर्वे यांचा प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

संदल, ढोल-तासाचा गजरात रैली काढण्यात आली. शहराचा विविध भागातून महिला भुजलिया घेऊन सहभागी झाल्या. यावेळी प्रामुख्याने सौ. रश्मिताई बर्वे (माजी अध्यक्षा, जी.प. नागपुर), कु. करुणाताई भोवते (उपसभापती पं. स. पारशिवनी), सौ. मीनाताई कावळे (सदस्य पं. स. पारशिवनी), श्री. पी.टी. रघुवंशी (ज्येष्ठ काँग्रेस नेते रामटेक), लक्ष्मण मेहर बाबुजी, बबलू दुधबर्वे, माजी नगराध्यक्ष शोभाताई राऊत, शारदाताई बर्वे, विमलताई नागपुरे, पुष्पाताई बर्वे, श्वेताताई दुधबर्वे, रती रघुवंशी (मामा), मोहन कोठेकर, धर्मेश भागलकर, माणिक ताकोद, अजय खेडगरकर, बिकेंद्र महाजन, दुर्जन बर्वे, शिवराम महाजन, राजू बावनकुळे, अनिल बंधाटे, रामप्रसाद बर्वे, मोनू रघुवंशी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: