रामटेक – राजु कापसे
रामटेक शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेत दोन गटात एकूण २० किल्लेदारांनी भाग घेतला. अचल गटात किट्सचा भुईकोट प्रथम तर छोटया अव्दिकचा प्रतापगड दुसऱ्या स्थानी आला. सर्वज्ञ येरपुडेच्या राजगडने तिसरा क्रमांक पटकावला.चल किल्ले गटात किट्सचा शिवनेरी प्रथम, प्रथमेश किंमतकरचा जंजिरा व्दितीय तर भार्गव मोकदमचा देवगिरी तिसऱ्या स्थानी राहीला.
निसर्ग आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सृष्टी सौंदर्य परिवाराने या किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते.या किल्ले स्पर्धेमुळे शहरात शिवकालिन इतिहासाच्या स्मृती जागविल्या गेल्या.
सृष्टी सौंदर्य परिवाराने आयोजित केलेली किल्ले स्पर्धा दोन गटात विभागण्यात आली होती. पहिला गट हा चल किल्ल्यांचा होता.या मध्ये कागद,पृृष्ठे यांचा वापर करुन किल्ले तयार करायचे होते. चल गटात एकूण १५ किल्लेदारांनी सहभाग घेतला होता. या सर्व किल्ल्यांची गांधी चौक येथे प्रदर्शनी लावण्यात आली होती.
अचल गटात माती, दगड,विटांचा समावेश करुन तयार केलेल्या किल्ल्यांचा समावेश होता. हे किल्ले किल्लेदारांनी त्यांच्या त्यांच्या घरी बनविले व परिक्षकांनी स्पर्धकांच्या घरी जावून या किल्ल्यांचे परीक्षण केले. माजीआमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते या किल्ले स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्ष स्थानी ऋषीकेश किंमतकर होेते. यावेळी प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे,वसंत डामरे,निवृत्त प्राध्यापक डॉ.रविंद्र बोपचे,डॉ अंशुजा किंमतकर यांची उपस्थिती होती.
किल्ले परीक्षक म्हणूून प्रा.डॉ.रविंद्र बोपचे, निखील डेकाटे,डॉ अंशुजा किंमतकर यांनी काम पाहीले. चंद्रपाल चौकसे,पोलीस उपअधिक्षक आतिश कांबळे, गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे,कुसुमताई किंमतकर, माजी प्राचार्य दीपक गिरधर, नत्थुजी घरजाळे यांनी किल्ले प्रदर्शनाला भेट देवून किल्लेदारांचा उत्साह वाढविला. माजी प्राचार्य सुनंदा जांभुळकर, सुभाष चव्हाण,ऋषीकेश किंमतकर,यांच्या हस्ते विजेत्या किल्लेदारांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
संचालन वेदप्रकाश मोकदम यांनी केले तर आभार नामदेव राठोड यांनी मानले. किल्ले स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी भुषण देशमुख आणि हेमंत रेवस्कर यांनी समर्थपणे सांभाळली. डॉ.बापु सेलोकर,दायपयांग मंडल,सारंग पंडे,आनंद खंते,सुचिता मोकदम,हुमणे आदींनी आयोजनात सहकार्य केले.