न्यूज डेस्क : देशात ‘द केरला स्टोरी’ प्रदर्शित झाला तेव्हा अनेक ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी शो विकत घेत मुलीना दाखविण्यात आला होता. तर भोपाळच्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीच्या स्क्रीनिंगसाठी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शो ठेवला होता. या शो साठी सिनेमागृहात नेलेल्या १९ वर्षीय तरुणीने लग्नाच्या आधीच मंडप सोडून प्रियकर युसूफसोबत पळून गेली. विशेष म्हणजे सिनेमाच्या प्रदर्शनानंतर, मुलीला भोपाळमधील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी युसूफपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
केरला स्टोरी चित्रपटाची कथा ही केरळमधील एका हिंदू महिलेची कथा आहे ज्याची भूमिका अदा शर्माने केली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिचे ब्रेनवॉश करून तिला सीरियात पाठवले जाते, जिथे तिला आयएस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास भाग पाडले जाते. गेल्या वर्षी टिझर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता.
भोपाळच्या नया बसेरा भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ हा तिचा शेजारी आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफसोबत लग्नापूर्वीच मुलगी पळून गेली होती. 30 मे रोजी मुलीचे लग्न ठरले होते आणि लग्न मंडप सोडून युसूफने लग्नासाठी ठेवलेली रोख रक्कम व दागिने घेऊन युसूफसोबत पळून गेली.
भोपाळच्या कमला नगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, युसूफने त्यांच्या मुलीला गोड बोलून फसवले आणि नंतर तिला घेऊन पळून गेला. युसूफने मुलीच्या नावावर बँकेचे कर्जही घेतले आणि तिला ईएमआय भरण्यास भाग पाडले, असा आरोप त्यांनी केला.
मात्र, कुटुंबीयांच्या आरोपांच्या विरोधात, मुलीने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, ती हिस्ट्रीशीटर असलेल्या युसूफसोबत पळून गेली होती. ज्यांच्या विरोधात सहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत, ती युसूफसोबत कोणत्याही दबावाशिवाय स्वतःच्या इच्छेने पळून गेली आहे.
◆ जिस युवती को प्रज्ञा सिंह ठाकुर ने दिखाई थी 'द केरल स्टोरी'
— News24 (@news24tvchannel) June 6, 2023
◆ वह युवती मुस्लिम प्रेमी के साथ घर छोड़ कर भाग गई #PragyaSinghThakur | #TheKeralaStory | #Bhopal pic.twitter.com/H4mzELAJ84