नांदेड – महेंद्र गायकवाड
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांची त्यांनी स्वतः केलेल्या विनंतीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कंधार पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली असल्याची प्रेसनोट पोलीस अधीक्षक कार्यलयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी जारी केली आहे. उदय खंडेराय यांनी यापूर्वी हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून त्यांच्या दांडगा अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यास होईल.
पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांची बदली पोस्टे वजिराबाद ते स्थागुशा, नांदेड या ठिकाणी करण्यात आली होती परंतु स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी भंडरवार यांच्या बदलीविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय प्राधीकरण येथे अर्ज केल्याने भंडरवार यांच्या बदली आदेशाला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधीकरण यांनी स्थगीती दिली होती.
दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर हे सेवानिवृत्त झाल्यानंतर जगदीश भंडरवार हे स्थागुशा येथे परस्पर हजर झाले होते. परंतु आज दिनांक 13 नोव्हेंबर .2023 रोजी पोनि जगदीश भंडरवार यांनी स्वतः अर्ज करून स्थागुशा एैवजी पोस्टे नांदेड ग्रामीण किंवा आर्थीक गुन्हे शाखा या ठिकाणी बदली करणे बाबत विनंती केली.
त्यामुळे कंधारचे पोलीस निरीक्षक व बिलोलीचे भूमिपुत्र उदय खंडेराय यांची स्थागुशा येथे नेमणुक करण्यात आली असुन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार हे पोस्टे नांदेड ग्रामीण येथे हजर झाले आहेत. उदय खंडेराय यांनी यापूर्वी हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचा यशस्वी जबाबदारी पार पाडली असून त्यांनी अनेक गुन्हेगारांना जेरबंद केले होते व विविध गुन्ह्यांचा छडा लावला आहे.त्यामुळे खंडेराय यांचा अनुभव जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी कामी येईल.असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.