रामटेक – राजु कापसे
आपला शहर स्वच्छ व सुंदर व्हावं हे प्रत्येक शहरवासी यांचे एक स्वप्न आहे. आपला लोकप्रतिनिधी म्हणून हे स्वप्न पूर्ण करणं माझं आद्यकर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने माझे अविरतकार्य चालले, त्याचाच एक भाग म्हणून आज शहरातील विविध ठिकाणी विकास कामाची सुरुवात करून त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
लवकरच हे विकास कामे पूर्ण होऊन याचा फायदा शहरवासी यांना होणार आहे. असे प्रतिपादन विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड आशिष जयस्वाल यांनी केले. आमदारांच्या विविध निधीतून होत असलेल्या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्या निम्मित आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत शहारातील प्रभाग क्रमांक १ विनोबा भावे वार्ड, प्रभाग क्रमांक २ अंबाळा वार्ड, प्रभाग क्रमांक ६ आंबेडकर वार्ड या भागात सिमेंट कॉंक्रीट रोडचे बांधकाम, रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक बसविणे, आर.सी. सी. नाल्यांचे बांधकाम, भूमिगत नाल्यांवर आच्छादन करणे तर राजाजी वार्ड येथे घनश्याम पांडे व्यायाम शाळा इमारत दुरूस्ती करणे, श्री.हनुमान सार्वजनिक देवस्थान मंगळवारी वार्ड येथे सभामंडप बांधकाम,नगर परिषद जवळील तुकडोजी महाराज सभामंडप नुतनीकरण करणे,गुरुमाऊली हनुमान मंदीर सुपर मार्केट चे नुतनीकरण या कामांचा समावेश आहे.
या सर्व विकास कामांचा दि .२४ ऑगस्ट २०२५ रोजी आमदार ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तर लवकरच ह्या कामाची सुरुवात करून हे बांधकाम व अन्य कामे पूर्ण होणार आहे. या कामासाठी स्थानिक आमदारांच्या निधीतून १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आमदार जयस्वाल यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी आणून अनेक विकास कामे चालू आहे.
या विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख राजेश किंमतकर, शिवसेना शहर संघटक बिकेंद्र महाजन,युवासेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शरणागत, नगरपरिषद रामटेक माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, माजी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, शंकर सावरकर,माजी उपाध्यक्ष आलोक मानकर, भाजपा चे राहुल किरपान,भाजप रामटेक शहर अध्यक्ष उमेश पटले,माजी नगरसेवक सुमित कोठारी, नरेश माकडे, राधेश्याम साखरे, प्रणय सोमनाठे, धर्मेश भागलकर, राहुल शर्मा, माजी नगरसेवक विनायक सावरकर,
माजी नगरसेवक सुरेखा माकडे, मेघाताई नेरूळवार, माजी नगरसेवक धामगये प्रियंका धमगाये, समाजसेवक हरिदास (बंडू) सांगोडे,श्रद्धा इंदोरकर, सविता शेंडे, ज्योती पटले, शुभम बिसमोगरे, ललित राठोड, राहुल ठाकूर यांच्या सह स्थानिक महिला व पुरुष उपस्थित होते…