सांगली – ज्योती मोरे
सांगलीतील कल्पद्रुम ग्राउंड वर श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याच्या वतीने 4 जानेवारी ते 14 जानेवारी अखेर संपन्न होणाऱ्या ह भ प पूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या श्रीराम कथेसह नाम संकीर्तन सोहळ्याच्या भव्य शामियान्याचा भूमिपूजन समारंभ आज सकाळी 11 वाजता आदरणीय नाना महाराज केळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी समितीचे अध्यक्ष पन्नालाल त्रिवेदी, कार्याध्यक्ष मनोहर सारडा, सचिव लक्ष्मण नवलाई, खजिनदार ओमप्रकाश झंवर, रतनलाल सारडा,राधाकिसन डोडिया, रमाकांत घोडके, कल्लाप्पा सुतार,विजय संकपाळ आदी मान्यवरांसह कार्यकारणी सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.