गावाच्या विकासाची जबाबदारी माझीच..आ,जयस्वाल
रामटेक – राजु कापसे
दि,16 मार्च रोज शनिवार ला काचुरवाही येथील माजी ग्रा,पं, सदस्य चंदू बावनकुळे,तसेच ग्रा, पं, सदस्य नंदकिशोर नाटकर, माजी पसं सभापती प्रा. किरण देवराव धुर्वे यांनी संबंधित कामाचे प्रस्ताव पाठवले होते.
या प्रस्तावाची दखल आमदार आशिष जयस्वाल यांनी खनिज विकास निधी अंतर्गत १५० करोड रु इतका निधी उपलब्ध करून दिला याच कामाचे भूमिपूजन काचुरवाही येथे करण्यात आले.
यात भारतीय स्टेट बँक काचुरवाही ते शंकर गोल्हर यांच्या घरापर्यंत ङांबरीकरण रस्ता,मधुकर बावनकुळे ते भास्कर बावनकुळे यांच्या घरापर्यंत ङांबर रस्ता,बाजार चौक ते संतोष गोल्हर यांच्या घरापर्यंतचा ङांबर रस्ता आणि बाजार चौक ते शंकर धुर्वे खंडाळा रोड यांच्या घरापर्यंतचा ङांबर रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनांतर्गत काचुरवाही ते मिन्सी नवरगाव काचुरवाही ते लोहडोंगरी या पांधन रस्त्यावर पक्के डांबरीकरण रस्त्याचा कामाला मंजुरी असून त्या कामासह संपूर्ण गावातील इतर रस्त्याचे सुद्धा काम सुरू करण्याचे व संपूर्ण गावातील रस्ते नाल्या,पिण्याच्या पाण्याची सोय,नळ, पाणी टाकी,व उर्वरित राहिलेल्या कामाचे प्रस्ताव शासनाला पाठवीले आहे असे आमदार आशिष जयस्वाल यांनी सांगीतले.
याप्रसंगी भूमीपूजनाला आमदार आशिष जयस्वाल,ग्रा, पं, सरपंच सविता नागोसे,माजी जि.प सदस्य नरेश धोपटे, संजीवनी पत संस्था अध्यक्ष तथा माजी जि.प सदस्य देवराव धुर्वे, माजी पंस सभापती प्रा. किरण धुर्वे, ग्रा पं, उपसरपंच अनिकेत गोल्हर,सदस्य नंदकिशोर नाटकर,रविंद्र मोहनकार,छाया कोकोडे, रामराम ङाफ , मोहनकार,
आकाश आयके,अश्विन पारधी, माजी सदस्य चंदू बावनकुळे , माजी ग्रा. प सदस्य सुभाष नागोसे, जेष्ठ राधेश्याम नाटकर ,माजी सरपंच सुनील डोकरीमारे, माजी सरपंच जागेश्वर बावनकुळे, माजी सरपंच मनोज सहारे, याच्यासह गावातील नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.