सांगली – ज्योती मोरे
मिरज तालुक्यातील इनाम धामणी मधील परमपूज्य गगनगिरी सेवाभावी संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या श्रीमती चंद्राबाई भाऊसो पाटील वारकरी भावनांचा भूमिपूजन सोहळा आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडला.
दरम्यान सदर वारकरी भवनासाठी जी काही मदत लागेल ती मदत करून या पवित्र कामात माझाही हातभार लागावा अशी भावना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.तर आषाढी आणि कार्तिकीला या रस्त्यावरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय या श्रीमती चंद्राबाई भाऊसो पाटील वारकरी भावनाच्या माध्यमातून करून वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळत आहे याचा आम्हाला आत्यानंद आहे.
अशी भावना सदर कार्यक्रमाचे निमंत्रक तथा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. यावेळी संत नामदेव फड प्रमुख ह भ प निवृत्ती महाराज नामदास ,आजरेकर फड प्रमुख ह भ प हरिदास महाराज बोराटे कोल्हापूर जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह भ प महादेव महाराज यादव,सांगली जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष ह भ प दत्तात्रय महाराज भोसले,देहूकर फळ प्रमुख ह भ प बापूसाहेब देहुकर ,आप्पासो मगदूम, महावीर पाटील,
सांगली जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह भ प दीपक महाराज माळी ,ह भ प रमाकांत बोंगाळे ,माजी महापौर किशोर जामदार, माजी नगरसेवक सुरेश आवटी, माजी महापौर विवेक कांबळे, ज्येष्ठ वारकरी ह भ प पांडुरंग कोळी,गगनराज पाटील, राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या सचिव मालुश्री विठ्ठलराव पाटील आदींसह इतर मान्यवर नागरिक तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.