Friday, July 19, 2024
spot_img
Homeराज्यबुलढाणा | भोई समाज मदत संस्था महाराष्ट्र मदतीचा धनादेश पोहचला...

बुलढाणा | भोई समाज मदत संस्था महाराष्ट्र मदतीचा धनादेश पोहचला…

आपल्या समाजातील स्वर्गीय सागर रमेश इटे वय :29 वर्ष मुक्काम पोस्ट खामगाव तालुका…

खामगाव जि बुलढाणा यांचा दिनाक :03/10/2022 रोजी ह्दय विकाराचा झटका आल्यामुळे निधन झाले.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक लहान मुलगा व एक लहान मुलगी आहे.व घरातील कर्ता पुरूषाचे निधन झालेले असल्यामुळे त्यांच्या कुटुबांची परीस्थिती खुप हालाखीची झालेली होती त्यामुळे त्यांना मदतीची नितांत गरज निर्माण झाली होती.

आपल्या भोई समाज मदत संस्था महाराष्ट्र यांच्या समन्वयकां मार्फत पिडीत कुटुंबाचे सत्य परिस्थितीचे निरीक्षण करून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला दि २२ ऑगस्ट २०२३ रोजी मदतीचे आवाहन भोई समाज मदत संस्थेच्या माध्यमातुन भोई समाजातील मदत दात्यांना करण्यात आले होते त्या आवाहानाला प्रतिसाद देत आपली मदत सढळ हाताने केली.

आज बूधवार दि ६ सप्टेंबर २०२३ रोजी मयत सागर रमेश इटे यांच्या पत्नीकडे 20000 अक्षरी वीस हजार रु रकमेचा चेक भोई समाज मदत संस्थेच्या माध्यमातुन सोपविण्यात आला आहे त्या प्रसंगी भोई समाज मदत संस्थेचे स्थानिक समन्वयक श्री निलेश मधुकर साटोटे , श्री प्रल्हादराव सुरजुशे, श्री विनायकराव ढोले,श्रीकृष्ण मेसरे, श्री आंनदा मेसरे, श्री शिवाभाऊ बावणे, श्री सुनिल विटे,आदी समस्त बाधंव उपस्थितीत होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: