(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणी साठी आमरण उपोषण..)
शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शहापूर शहरात उभारण्यात यावा या मागणीसाठी गेल्या ६७ दिवसापासून घर छोडो आंदोलन करणाऱ्या रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या ज्योती गायकवाड आणि त्यांचे पती सत्यकाम पवार आता त्यांचं आंदोलन आणखीन तीव्र करणार आहेत.
रखरखत्या उन्हात तब्ब्ल ४०-४१. डिग्री तापमान असताना ज्योती गायकवाड या शहापूर तहसीलदार कार्यलय समोर आंदोलन करीत आहेत.. पण शासनाला डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा उभारावा…या आपल्या मागणीची बिलकुल काही पडलेली नाही..
शहापूर तहसीलदार पुतळा उभारणी साठी जागा देऊ असं तोंडी आश्वासन देत आहेत पण लेखी आश्वासन द्यायला तयार नाहीत..एकीकडे शासन आपल्या दारीं असा कार्यक्रम करणारे राज्यकर्ते… तर आपण आज शासनाच्या दारात गेल्या ६७ दिवसापासून आहोत..
आणि आता आपण १४एप्रिल पासून आमरण उपोषण करणार आहोत आणि इच्छा मरणाचा दावा सर्वोच्च न्यायलयात सादर करणार आहोत..आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला शासन आणि इथले अधिकारी जबाबदार असतील अशी माहिती ज्योती गायकवाड यांनी दिली आहे…
शहापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणी मागणी पूर्ण झाल्या शिवाय आपण आता मागे हटणार नाही असं ज्योती गायकवाड यांनी नमूद केलं आहे..