Monday, November 18, 2024
HomeBreaking NewsBhigavan | इंदापूर येथील लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून...

Bhigavan | इंदापूर येथील लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून महिलांना व ग्राहकांना पकडले…

Bhigavan : अनेक वर्ष लॉजचे नाव बदलुन मदनवाडी ता.इंदापुर येथे चालु असलेल्या वेश्या व्यावसायावर भिगवण पोलिसांनी धाड टाकली असुन भिगवण पोलिसांना वेश्या व्यावसाय करणाऱ्या महिला आणि ग्राहक सापडले मात्र एजंट मार्फत वेश्या व्यावसाय करुन घेणारे पोलिसांना सापडतात की राजकिय वजन वापरुन आपली मान सोडवतात हे पाहण औत्सुक्याचे ठरेल.
मदनवाडी गाव तस चांगलं पण वेशीला टांगलं अशी अवस्था गावची झाली असुन वेश्या व्यावसायामुळे गावचे नाव खराब झाले आहे अनेक वर्ष छुप्या पध्दतीने मदनवाडीत वेश्या व्यावसाय चालु आहे मात्र गाव पुढारीच यात सामिल असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा कोणी हा प्रश्न असल्याने गावकऱ्यांना तोंड दाबुन बुक्याचा मार सहन करावा लागत होता. भिगवण पोलिसांनी आज केलेल्या कारवाईमुळे भिगवण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असुन भविष्यातही असाच वचक अवैध व्यावसायावर रहावा अशी अपेक्षा देखील ग्रामस्थ करत आहेत
साठ गावची साठ आणि मदनवाडीची फक्त आठ अशी यापुर्वी मदनवाडी गावाची ओळख होती गावात कुस्तीशौकीन असल्याने अन्याय झाला तर कायद्यापेक्षा स्वत:च न्याय देण्याच्या भावनेतुन भांडण करणारे गाव अशी ओळख होती मात्र या दहा वर्षात गावातील पुढारी बदलले आणि गावची व्याख्या देखील बदलली व अवैध व्यावसाय करणारे गाव अशी झाली ज्यांना अवैध व्यावसाय करायचाय त्यांना मदनवाडीत पायघड्या घालुन बोलावण्याची स्पर्धा चालु झाली मात्र आज भिगवण पोलिसांनी केलेली कारवाई गुन्हेगारांना धडा शिकवेल आणि गाव पुढाऱ्यांना अद्दल घडवेल अशी अशा निर्माण झाली आहे.
भिगवण पोलिसांनी मदनवाडीत केलेली कारवाई अतिशय धाडसी आहे आमदार मंत्र्यांचे लागेबांधे असल्याने यापुर्वी कारवाई केली जात नव्हती तर या गोष्टीचा गैरफायदा घेत काही पोलिसही अर्थपुर्ण हितसंबंध जपुन या वेश्या व्यावसायाला अभय देत होते आजच्या कारवाईने अशा अर्थपुर्ण हितसंबंध जपणाऱ्या पोलिसांनाही चांगलीच चपराक आहे भिगवण पोलिस स्टेशनचे अधिकारी विनोद महांगडे हे या व्यावसायिकांना जसे महागडे पडले तसे भविष्यात पोलिस कर्मचारी यांनाही तितकेच महागडे पडतील अशी अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: