Sunday, November 17, 2024
Homeविविधभेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; असा राहील पाऊस असे आहेत खरिप व...

भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; असा राहील पाऊस असे आहेत खरिप व रब्बी हंगामाचे पीक अंदाज…

अमोल साबळे

राज्यभरातील शेतकरी भविष्यवाणीच्या प्रतिक्षेत असतात ती बुलढाणा जिल्ह्यातील घटमांडणी अक्षयतृतीयेला मांडली गेली होती. आज रविवारी पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी भविष्यवाणी वर्तविली गेली आहे.

असा राहील यावर्षी पाऊस

जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईलजुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणारआहे. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी देखील होईल सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल पण अवकाळी पाऊस भरपूर असून,पिकांचे नुकसान होईल असा पीक पाण्याचा अंदाज यावर्षी पिकांवर रोगराई राहिल कापूस पीक मध्यम होईल,कापसात तेजी असेल ज्वारी सर्वसाधारण राहिल तूर पीक चांगले असेल मूग पीक सर्वसाधारण असेल उडीद मोघम सर्वसाधारण तीळ सर्वसाधारण मात्र नासाडी होईल बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल.

तांदुळाचं चांगलं पीक येईल, गहू सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहिल हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल. मात्र नुकसान सुद्धा होईल देशा संबंधीही केली भविष्यवाणी संरक्षण मजबूत राहिल, मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या असतील देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल, चढउतार होईल राजा कायम राहील राजा कायम आहे,

पण राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच राजा कायम तणावात असेल.राजकीय उलथापालथ होत राहिल या भेंडवळ घटमांडणीला गेल्या ३५० वर्षांची परंपरा असून ती आजही जोपासली जात आहे. या घट मांडणीतून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज घेतला जातो.

अशी असते घटमांडणी

गावाबेरील शेतात एक वर्तुळ आखले जाते, त्या मधोमध खड्डा केला जातो. या खड्ड्यात मातीचा मडके (घट) ठेवतात. या घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारची धान्य, अशा या ’घट मांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. ही भविष्यवाणी खरी ठरते, असा दावा बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील अनेक शेतकरी दावा अक्षयतृतीयेला ही प्रथा जोपासली जाते.

या प्रथेला शेतकर्‍यांची मोठी मान्यता असते आणि या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकर्‍यांमध्ये मोठी उत्सुकता असते. राज्यातील शेतकर्‍यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो, अशी ही घटमांडणी येत्या शनिवारी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावात होणार आहे. 350 वर्षांपूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही प्रथा आजही सुरू आहे.

आजच्या काळात तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचं निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात.  मात्र येणार्‍या वर्षभरात नेमकी पावसाची, पिकांची, देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे? हे या अंदाजानुसार जाणून घेण्यासाठी यावर्षी शेतकर्‍यांमध्ये मोठी उत्सुकता होती.

हे अंदाज किती खरे ठरतात? यावर शंका असली आणि या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला, तरीही शेतकरी वर्ग मात्र यावर मोठा विश्वास ठेऊन आपल्या वर्षभराचं शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसार करतात. शनिवारी मांडण्यात आलेल्या घट मांडणीचे आज पहाटे निरीक्षण करून खालील प्रमाणे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यावर्षी सुद्धा अक्षय तृतीयेला घट मांडणी करण्यात आली होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: