Sunday, December 22, 2024
Homeशिक्षणस्व.देवकीबाई बंग विद्यालयाचा भावेश निवांत हिंगणा तालुक्यातून प्रथम…

स्व.देवकीबाई बंग विद्यालयाचा भावेश निवांत हिंगणा तालुक्यातून प्रथम…

विद्यालयाचा १०० टक्के निकालासह ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर ४३ विध्यार्थी प्रविण्य श्रेणित…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर -हिगंणा- स्थानिक स्व. देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील भावेश निवांत या विध्यार्थ्याने १० वी च्या बोर्ड परीक्षेत ९६ टक्के गुण घेत हिंगणा तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला.तर विद्यालयातील रुषभ आरेकर ९१ . ४० % हर्ष राहांगडाले ९१.४०% संचाली राठोड ९०.८०% निहाल भगत ९०.८०%
श्रद्धा सिंगाडे ९० २० % गुण मिळवत विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला.

विद्यालयाने दहावीच्या बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल देण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवत विद्यालयातील 114 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले त्यातून 114 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात 6 विद्यार्थी गुणवत्ता श्रेणित 43 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत तर 23 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.

गुणवत्ता श्रेणी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, संस्थेचे कोषाध्यक्ष महेश बंग, उपाध्यक्ष अरुणा बंग, प्राचार्य नितीन तुपेकर यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य नितीन तुपेकर, अतूल कटरे, नितीन लोहकरे दिपक कानेरकर,सोनम लारोकर,सुषमा भलावी संगिता जोधे आदी शिक्षकांसह पालकांना दिले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: