शहापूर / प्रफुल्ल शेवाळे
लक्षावधी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून व क्रांतिकारकांच्या बलिदानातून मिळालेल्या भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत आहेत. हा अमृतमहोत्सव साजरा करत असताना या शूरविरांचे स्मरण करणे व नव्या पिढीला त्यांच्या बलिदानाची महती कळणे या हेतूने भारताचे मा.पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी “घर घर तिरंगा” अभियान जाहीर केले आहे. प्रत्येक भारतीय नागरीकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात आपल्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा लावावा असं आवाहन करण्यात येत आहे.
तिरंग्याचा योग्य तो सन्मान राखला जाईल याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.. याच धर्तीवर मुंबई ला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुकयातील भातसा धरणाला आपल्या तिरंगा रुपी रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे… धरण क्षेत्रात सातत्याने पडणाऱ्या पावसाने भातसा धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आहेत..
तिरंगा रुपी विदयुत रोषणाई मुळे धरणाच्या दरवाजा मधून कोसळणाऱ्या पाण्याचं सुंदर मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे.. सदर विद्युत रोषणाई 15ऑगस्ट पर्यंत कायम ठेवणार असल्याचे समजते. सदर धरणाचे फोटो आणि विडिओ मोठया प्रमाणात मोबाईलवर वायरल होत आहे…