सांगली – ज्योती मोरे.
सांगली येथे संपन्न होत असलेल्या आध्यात्मिक आशिर्वचन व शिव कथा धर्म सभेत हे मत व्यक्त केले. महिलांनी शिवतांडव स्तोत्र सादर केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली..
जगद्गुरु पुढे असे म्हणाले की, भस्म शरीरावर धारण करण्याची प्रथा ही अनादी काळापासून चालत आलेली आहे..
शंकर देव देखील दररोज भस्म परिधान करीत असत..
लिंगायत धर्मातील प्रत्येक व्यक्तीने भस्म धारण केल्या नंतर त्याच्या मनात सात्विक विचार प्राप्त होतात, त्याच्या मनात कोणतेच भेदभावाचे विचार येत नाहीत, म्हणून लिंग धारण करून आचरण केल्यास आपणास भौतिक व आध्यात्मिक संपत्ती प्राप्त होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाचार्य बेळंकी महाराज व म्हैशाळकर महाराज यांनी धर्मोपदेश केला.या कार्यक्रमाला माननीय विश्वजीत कदम माननीय जितेश कदम मा.जयंत पाटील, मा. दिनकर तात्या पाटील, मा. पृथ्वीराज पाटील, मा. पृथ्वीराज देशमुख यांनी स्वामीजींचे दर्शन घेऊन स्वामीजींच्या कडून शुभाशीर्वाद घेतले.. सकाळच्या 17 मध्ये एकूण 1360 लोकांनी दीक्षाविधी घेतला सांगली जिल्ह्यातील जंगम समाजाने या कार्यक्रमाचे पौरोहित केले.