३२ वर्षानंतर पुन्हा भरला १० वी चा वर्ग ; शालेय जीवनातील आठवणींना उजाळा…
” लहानपण देगा देवा विसर न व्हावा ” या म्हणीचा आणला प्रत्यय…
मूर्तिजापूर – समाज माध्यमांमुळे मित्र-एकमेकांपासून दूर गेल्याची टीका होते मात्र, याच माध्यमामुळे शाळेतील जुने मित्र मैत्रिणी एकत्रही येत आहेत. ३२ वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. पन्नाशीत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा बाकांवरच्या मित्र-मैत्रिणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शहरातील भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मूर्तिजापूर येथील १० वीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन समारंभानिमित्त सर्वजण सालासार रिसोर्ट येथे एकत्रीत झाले . शाळा हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आयुष्यात शाळा व शिक्षक ही खूप महत्त्वाची भूमिका असते . शाळा सोडल्यानंतरही शाळा, शाळेतील शिक्षक आणि त्यांच्या आठवणी या आयुष्यभर आठवणीत असतात. काही जण स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या आठवणी जिवंत ठेवतात.
” ए तुझ्यात किती बदल झालाय, अय्या तू ओळखूच येत नाही, तू किती बदलली / बदलला ” अशा संवादाने शहरासह ग्रामीण भागातील सवंगड्यांचा तब्बल ३२ वर्षांनंतर मेळ जमला. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येऊन एकमेकांना भेटतांना आपुलकीने विचारपूस करत मनसोक्त गप्पा रंगल्या. मूर्तिजापूर येथील भारतीय ज्ञानपीठ शाळेच्या १९९२ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मूर्तिजापूरच्या प्रसिद्ध सालासार रिसोर्ट येथे संपन्न झाला. दहावी परीक्षा दिल्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी एकमेकांना पाहून विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी उत्साहीत झाले.सर्व शालेय विद्यार्थी मित्रांच्या समनव्यातुन सालासार रिसोर्टच्या प्रांगणात विद्यार्थी व विद्यार्थीनीने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.विद्यार्थी जसे एकमेकांना भेटून आनंदीत झाले तसे या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थीनीचे पती हे सुद्धा आनंदीत झाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना शुभेच्छा देतांना हा ३२ वर्षानंतर वर्ग मित्रांसोबत एकत्र येण्याचा योग ज्यांनी घडवून आणला त्यांचे सुद्धा कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून स्वतःची ओळख करून देताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी शाब्बासकी, तासाच्या वेळी केलेली शिक्षा, कौतुकाने दिलेली – गंमतीजमती सांगताना किती बोलू किती नाही अशी स्थिती सर्वांची झाली होती. शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घेवून कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी सचिन आंबेकर, राजेश गुलवाडे, प्रदीप गणेश, उज्वल दबडघाव, दिनेश बोर्डे, शिवकुमार चांडक, हितेश बावनेर,सचिन कंट्रे, अमोल सुपले,सुधीर दुबे,नितीन बजाज,रणजीत गवई, राजगोपाल सावळे, प्रशांत मुळे, अमोल सुपले,नितीन इंगोले, कश्यप जगताप, अतुल खंडारे,दीपक ठोकळ, पवन बाहेती,अतुल खंडारे, नितीन देशमुख. कुमुद संगमवार,सुनीता तडस, अर्चना शहा, वर्षा पोळकट ,सीमा जोगदंड, बबीता चिंचे,ज्योती पटेल, हेमलता परांजपे, रश्मी माळोदे,अर्चना टापरे, कल्पना शिंदे,मंजू सोनटक्के,मंजुषा शिंगणे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.