Monday, December 23, 2024
Homeराज्यभारतीय जनता पार्टीच गाव चलो अभियान...

भारतीय जनता पार्टीच गाव चलो अभियान…

रामटेक – राजु कापसे

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष माजी आमदार श्री सुधाकरजी कोहळे यांच्या नेतृत्वात रामटेक शहर भाजपच्या बूथ क्रमांक १२७ वर प्रवासी कार्यकर्ता म्हणून विधानसभा समन्वयक माजी नगरसेवक संजय मुलमुले यांनी गाव चलो अभियान राबविण्यास सुरुवात केली.

बूथ प्रमुख आकाश देशमुख यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन मोदी सरकार व महाराष्ट्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. भिंतीवर कमळ काढण्यात आले. पक्षांनी गाव चलो अभियाना अंतर्गत दीलेल्या सर्व कार्यक्रम राबवून प्रतिष्ठीत व्यक्तीच्या भेटी घेतल्या.चाय पे चर्चा करून अभियानाचा समारोप करण्यात आला.

यावेळी माझ्यासह माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ देशमुख, नगरपालिका माजी उपाध्यक्ष आलोकजी मानकर, माजी नगरसेविका अनिताताई टेटवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष शुभंमजी बिसमोगरे, बूथ प्रमुख आकाश देशमुख,शामभाऊ वंजारी सह परिसरात मातृशक्ती बंधू भगिनी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: