शहापूर मधील भीम कन्येचा आंदोलनाचा लढा यशस्वी…
शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
शहापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक शहापूर तहसीलदार कार्यालय प्रारंगणात व्हावें याकरिता शहापूर मधील रमाबाई ब्रिगेड महिला संघटना संस्थापक अध्यक्ष ज्योती गायकवाड या गेल्या ७५ दिवसांपासून घर छोडो आंदोलन करीत होत्या… आणि १४ एप्रिल पासून ज्योती गायकवाड यांनी आमरण उपोषण सुरु केले होते.. परंतु अखेर शासनकर्ते नमले…
दि. १८ एप्रिल रोजी शहापूर तालुका तहसीलदार कोमल ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मंजूर करावा असे लेखी कागदपत्रांची पूर्तता केली आहे.व जिल्हा अधिकारी यांनी लवकरात लवकर स्मारकास परवानगी मिळणे बाबत प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.खरोखर लोकशाही मार्गाने आपला लढा यशस्वी झाला आहे…
आपले वडील बु. भगवान गायकवाड यांनी सुद्धा आपल्या हयातीत या स्मारकासाठी खूप प्रयत्न केले होते… परंतु आता घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं स्मारक आता शहापूर मध्ये लवकरच नावारूपाला येणार आहे..यास्तव ज्योती गायकवाड यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केले आहे..
या आपल्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व भीम सैनिकांचे माता भगिनींचे मनापासून अभिनंदन तसेच भदंत शीलबोधी थेरो यांनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाला यशस्वी केले त्या बद्द्ल संपूर्ण समाजाच्या वतीने आभार व्यक्त करत आंदोलनकर्त्या ज्योती गायकवाड यांनी ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तहसीलदार, आणि तमाम आंबेडकरी जनतेला सर्वांना धन्यवाद दिले आहेत..