Saturday, November 23, 2024
Homeराज्यभारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे करुणासागर महामानव...अनुसूचित मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन व्हनखंडे

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे करुणासागर महामानव…अनुसूचित मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन व्हनखंडे

सांगली – ज्योती मोरे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं होतं. त्यामुळंच या दिवसाला महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस म्हटलं जातं. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठं योगदान दिलं. देशात समता, बंधुता नांदावी म्हणून ते आयुष्यभर झटत होते.

देशामधील जातीभेद नाहीसा व्हावा, दलित बांधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून डॉ. आंबेडकर शेवटपर्यंत लढले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची राज्यघटना बनवण्याची जबाबदारी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थपणे पेलली. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. पूज्य बाबासाहेब केवळ दलित जनतेचे नेते नव्हते. तर देशातील समस्त गोर गरीब जनतेबद्दल कळवळा असलेले महामानव होते.

सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या प्रयत्नामुळेच हजारो दलित आणि वंचितांचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत. अशा महामानवाचे उपकार भारतीय जनता कधीच विसरणार नाही. अशी भावना भाजपचे अनुसूचित मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन व्हनखंडे यांनी व्यक्त केली. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे , नगरसेवक विनायक सिंहासने, भाजपा प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस मोहन व्हणखंडे, श्रीकांततात्या शिंदे, प्रियानंद कांबळे, गणपती साळुंखे, गौस पठाण, बाबासो आळतेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: