Sunday, November 17, 2024
Homeराज्यभारत रंग महोत्‍सव-२०२४ कार्यक्रम नागपूर मध्ये रंगणार...

भारत रंग महोत्‍सव-२०२४ कार्यक्रम नागपूर मध्ये रंगणार…

रामटेक – राजु कापसे

भारत सरकारचे सांस्‍कृतिक कार्य मंत्रालय व नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, (NSD) नवी दिल्ली यांच्‍या संयुक्‍त वतीने ‘आझादी का अमृत महोत्‍सव’चे औचित्‍य साधून आंतरराष्‍ट्रीय नाट्य महोत्‍सव ’२५ वा वार्षिक भारत रंग महोत्‍सव – २०२४’ चे आयोजन करण्‍यात आले आहे. संपूर्ण भारतभरात २१ फेब्रुवारी रोजी या महोत्‍सवानिमित्‍त लाइव्ह परफॉर्मन्‍स सादर केले जाणार आहेत.

या ऐतिहासिक उपक्रमात नागपूर व रामटेक येथील लोककला संस्‍था सहभागी होत असून दुपारी १२ ते ३ या वेळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्‍व्‍हेंशन सेंटर येथे लाईव्‍ह परफॉर्मन्‍स प्रस्‍तुत करतील. ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘पंच प्राण’, ‘विकसीत भारत’ या तीन संकल्‍पनांवर आधारित हे सादरीकरण राहणात आहे.

यात जय भीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक, शाहीर टेंभुर्णे गुरुजी सार्वजनिक वाचनालय रामटेक, खडी लॉर्ड अशोका बॅकवर्ड मल्टीपर्पज सोसायटी रामटेक, चौताली भजन दंडार मंडळ लाखणी-भंडारा, मां शारदा बहुउद्देशीय संस्‍था लाखणी-भंडारा यांचा सहभाग राहील

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: