गणेश तळेकर
दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळ अलिबाग येथे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सभा आयोजित करण्यात आली. या सभे करीता अलिबाग,मुरुड,श्रीवर्धन,म्हसळा रोहा,महाड,पनवेल,परिसरातील भंडारी बंधू भगिनींनी प्रचंड संख्येने अलिबाग येथे सकाळी ११ वाजता उपस्थित रहावे अशी विनंती आहे.
बांदिवडेकर यांनी केली होती त्याप्रमाणे प्रचंड भंडारी ताकदीचे दर्शन दाखवले, भंडारी इतिहासाची दखल राज्य सरकार घेणार नाही.आपली अस्मिता जोपासली जावी या करीता शूरवीर मायनाक भंडारी यांचा जाज्वल्य इतिहास उघड व्हावा,म्हणून भंडारी समाज एकवटला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या आणि हिंदुस्थानातील पहिल्या आरमाराचे आरमार प्रमुख म्हणून मायनाक भंडारी आणि दौलतखान ह्यांची नेमणूक केली.पराक्रमी व दर्यावर्दी असणाऱ्या शिव आरमारात प्रामुख्याने भंडारी समाजातील वीरांचा समावेश होता व त्याच बरोबर आगरी,कोळी,गाबीत,दालदी,मराठा,कुणबी समाजातील विरांचाही समावेश होता.
आरमार प्रमुख मायनाक भंडारी दौलत खान ह्यांनी खांदेरी किल्ला उभारतांना त्यांनी केलेल्या शौऱ्याची,पराक्रमाचा अभूतपूर्व इतिहासाची नोंद आहे,१९ सप्टेंबर १६७९ पर्यंत आरामाराचा शेकडो वर्ष अनुभव असलेले इंग्रज हे सागरी युद्धात अपराजित होते.आणि याचा त्यांना गर्व होता,
याच इंग्रजांनी १९ सप्टेंबरला १६७९ रोजी पूर्ण जय्यत तयारी निशी खांदेरीवर हल्ला केला.मोठ्या युद्धनौका आणि लांबपल्याच्या तोफा,दारूगोळा आणि निष्णात आरमारी सैनिक दिमतीला होते,परंतु मायनाकांनी ब्रिटिशांना सडेतोड जवाब देत नामोहरण केलं होते,जगाच्या इतिहासात इंग्रजांचा हा पहिला पराभव झाला.
अनेक सैनिक व अधिकारी मारले गेले आणि इंग्रजांची पळताभुई झाली.त्या नंतर पुढे त्यांनी तह केलं आणि शीव आरमाराचे खांदेरी वरील वर्चस्व मान्य केलं.असा दैदिप्यमान इतिहास असतांना सेनापती मायनाकांचा व भंडारी नौसैनिकांचा जाज्वल्य पराक्रमाची दखल सरकार,सर्व प्रसार माध्यम,इतिहासकार ह्यांनी आज पर्यंत घेतलेली नाही,परिणामी शासनाने सन २०१५ मध्ये खांदेरी बेटाचे नाव बदलून सरखेल कान्होजी आंग्रे बेट ‘असे नामकरण केलं आहे.
असे का व्हावे?कारण मराठा समाज,इतिहासकार व सरकार प्रत्यक्ष इतिहास डावलून प्रत्यक्ष सहभागी,पराक्रम केलेल्या मायनाक भंडारी व सागर किनार पट्टीत आता वास्तव्यास असलेल्या की जे त्या काळातील आरमार सैनिकांचे आताच्या पिढीच्या पूर्वजांनी केलेला इतिहास पुसून काढीत आहेत,आणि कान्होजी आंग्रे हेच छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी स्थापन केलेल्या आरमाराचे पहिले आरमार प्रमुख आहेत,कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ साली झाल्याची इतिहासात नोंद आहे.
त्या वेळा ते केवळ १० वर्षांचे होते.मग ते पहिले आरमार प्रमुख कसे असू शकतात.आणि राज्यकर्तेही ते मान्य करीत आहेत आणि म्हणून आपल्या समाजास व आरमार सेनापती ह्यांचे इतिहास दुर्लक्षित करीत आहेत,आणि म्हणून त्यांना आम्ही कोण आहोत,आमचा आणि मयानकांचा काय इतिहास आहे हे शासन स्तरावर सांगावा लागणार आहे.
तसेच”अलिबाग या शहराचे नाव बदलून” मायनाक नगर”असे करावे,अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकारी ह्यांचे मार्फत शासनास द्यावयाचे आहे. या साठी सोमवार दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी बहुसंखेने एकत्र हजर राहिले, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांनी त्याचे अभिनंदन आणि स्वागत केले,