भंडारा – सुरेश शेंडे
विदर्भात काही ठिकाणी पावसाने जोर धरला असून आज भंडारा जिल्हयातील मोहाडी डोंगरगाव येथे शेतात भात रोपणी करण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर वीज पडून दोन महिला ठार तर चार जखमी झाल्या आहेत. जख्मी महिलांना ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे भरती करण्यात आले आहे जख्मी झालेल्या मध्ये निशा ज्ञानेश्वर वंजारी डोंगरगाव, वंदना मधुकर जीभकाटे, डोंगरगाव , रमा बंडु निमजे आंधळगांव मैना पतीराम सोनकुसरे आंधळगाव जख्मी आहेत, मृत्यू पावलेल्या मध्ये मृत्यू कलाबाई सुखाजी गोखले आंधळगाव वय 60 वर्ष दुसरी महिला आशा सुरेश सोनकुसरे आंधळगाव वय 50 वर्ष हे आहेत.