नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या युवकाची हत्या ही निंदनीय घटना असून या प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा व्हावी व भालेराव कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच या घटनेस जातीय वळण न देता दोन्ही समाजात सलोख्याचे संबंध राहावेत असे मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भालेराव कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटी दरम्यान व्यक्त केले.यावेळी चव्हाण यांनी भालेराव कुटुंबियातील व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्याची मागणी उपस्थित पोलीस अधिकाऱ्याकडे केली.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मयत अक्षय भालेराव यांच्या घरी आज भेट देऊन भालेराव कुटुंबियांचे सांत्वन केले.या प्रसंगी विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते मा.आ.अमरनाथ राजूरकर ,आ.मोहनअण्णा हंबर्डे, काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम,माजी नगरसेवक सुभाष रायबोले,माजी महापौर प्र.विलास धबाले, माजी नगरसेवक प्रशांत अण्णा तिडके, माजी नगरसेवक राजू येन्नम, माजी नगरसेवक रमेश गोडबोले, माजी नगरसेवक संदीप सोनकांबळे, बिलोलीचे माजी नगरसेवक प्र. महेंद्र गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री म्हणाले की, गावात सामाजिक सलोखा व शांतता राहावी यासाठी दोन्ही समाजातील व्यक्तींनी व पोलिसांनी पुढाकार घ्यावा .मी या परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो व वारंवार पोलिसांना सूचना देऊन या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करावा.व आरोपीस कठोर शिक्षा व्हावी पिडीत भालेराव कुटुंबियाला न्याय मिळावा असे यापूर्वीच सांगितले आहे . यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुरज गुरव,पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित होते.