अकोला – आषाढी च्या पर्वावर अकोल्यातील स्वरनाद च्या चिमुकल्या कलावंतांच्या सुमधुर स्वरांनी भक्तीरंग रंगला. या चिमुकल्या कलावंतांनी विठू नामाचा गजर करीत अकोल्यात अवघे पंढरपूर उभे केल्याचा प्रत्यय अकोलेकरांनी घेतला.
येथील न्यू खेतान नगर कौलखेड स्थित स्वरनाद म्युझिक अकॅडमी च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त भक्तीरंग या भक्तीसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री गजानन महाराज मंदिर हिंगणा रोड, बलोदे ले आऊट येथे हा सुरेल भक्तीगीतांचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी गजानन म. मंदिर संस्थांन चे कोषाध्यक्ष रामदयाल इंगळे, ज्येष्ठ संगीतकार सुधाकर अंबुस्कर ,भिमराव गावंडे , माजी सैनिक विजय चराटे, स्वरनाद अकॅडमी चे संचालक प्रा.गोपाल राऊत,सह संचालिका सौ. सोनू राऊत इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अकॅडमी मधील विद्यार्थी शिवांश इंगळे,रेयांश कानडे,आरोही राऊत, पूर्वश्री डिक्कर, भक्ती वारोकार, सई कुलकर्णी, कृष्णल टाले, वैभवी राऊत, मृदुला इंगळे,स्वराली राऊत, मधुरा गावंडे, मुक्ता पाटील, लता मानकर, परी गाडेकर, कल्पना तायडे,पूजा डोंगरे,किमया चिका र या विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक अशी भक्ती गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
जाग्रवी राऊत व शिवार्थ अवचार यांची वेशभूषा साक्षात विठ्ठल रखुमाई चे दर्शन घडवून गेली.कार्यक्रमात साथ संगत मनोज राऊत, भास्कर मोहोड, मितेश तायडे,राजगुरू पवार,पियूष झोंबाडे,भूषण कुटे,मयुर चिलवंत,यथार्थ काळे,राघव विंगळे,प्रणव भातखडे, गुरुप्रसाद पवार यानी केली . कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रा. बाळकृष्ण खानझोडे यांनी केले. प्रा.गोपाल राऊत यांच्या भैरवी ने कार्यक्रमाची सांगता झाली.