रामटेक ( प्रतिनिधी )
मनसर येथील नागार्जुन बुद्धविहार येथे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा ८८ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरवातीला मनसर येथील बुद्ध विहारात सकाळी ९.००वाजता भंन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचे आगमन झाले तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदना घेण्यात आली त्या नंतर तिथून बाईक रेली काढून मनसर चौक ते मंजुश्री बुद्धविहार, मनसर येथे पोहचली तिथे भंन्तेजी च स्वागत करण्यात आले. नंतर बुद्ध विहार मध्ये वंदना करण्यात आली.
त्यानंतर वाढदिवसानिमित्त भंतेजी सुरई ससाई यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.केक कापल्यानंतर भंतेजींच्या चाहत्यांसाठी भोजन दानाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी भंदत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रामटेक चे पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर,सचिन सोमकुवर,अविनाश शेंडे,जगदिश सांगोडे, दीपक सहारे,सोनू चौहान,नीरज बांगरे,राहुल जोहरे सर,अमित अंबादे,राकेश साखरे,मनीष खोब्रागडे,पुनम अंबादे, नरेंद्र मेश्राम, विकास डुले,समीर घरडे, राजेश सांगोडे,अवी बागडे,गौरव रामटेके,पंकज मेश्राम,जित दुपारे,अक्षय डोंगरे, रजत बोरकर,प्रतीक साखरे तसेच महिला संघ मनसर तसेच विविध संघ व असंख्य बुद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.