- राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनेत गर्भ श्रीमंत पुढे तर गरीब वंचित
- पातुर शहरासह तालुक्यातील बोगस गर्भ श्रीमंताकडून
- पी एम किसान योजनेची घेतलेली रक्कम परत वसुली करण्याचे आदेश
पातूर – निशांत गवई
महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून गोरगरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना विविध योजना अंतर्गत घरकुल तसेच आरोग्यसेवा आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना अशा एकना अनेक योजना राबवल्या जात आहेत तसेच योजना राबवताना शासनाकडून पारदर्शकता बाळगण्यात आलेली आहे.
मात्र असे असताना सुद्धा दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये गर्भ श्रीमंताचा समावेश करणे विविध घरकुल योजनेमध्ये गोरगरिबांना सोडून गर्भ श्रीमंतांना लाभ देणे भारत निर्मल शौचालय योजनेअंतर्गत गर्भ श्रीमंतांना लाभ देण्यात आला आहे दारिद्र रेषेखालील यादीमध्ये गोरगरिबांना डावलून गर्भ श्रीमंतांना दारिद्र्य खालील योजनेमध्ये लाभ दिल्याने हजारो गोरगरीब वंचित झाले आहेत.
याबाबत हजारो तक्रारी झाल्या मोर्चे निघाले परंतु कोणत्याच प्रकारची कारवाई बोगस लाभार्थ्यांवर करण्यात आली नाही मात्र गोरगरीब कष्टकरी मजूर यांना दारिद्र्यरेषेतून डावल्यामुळे कित्येक महिलांचे पती मरण पावले महिला विधवा झाल्या मात्र त्यांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेच्या प्रमाणपत्र अभावी मिळाला नसल्याने दुखत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत अशा एक ना अनेक योजनांमध्ये गर्भ श्रीमंतांनी आपले ठाण मांडलेले आहे यामध्ये विविध राजकीय पक्षाचे पुढारी कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
एवढ्यावरच गर्भ श्रीमंताची मदार भागली नाही म्हणून त्यांनी पीएम किसान योजने चा लाभ घेण्यासाठी शासनाला खोटी माहिती सादर करून शासनाच्या हातावर तुरी दिल्या आणि पीएम किसान योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात आपल्या पदरात पाडून घेतला मात्र शासनाने सदर योजना राबवताना मोठ्या प्रमाणात पारदर्शकता ठेवली होती.
लाभ दिल्यानंतर ऑनलाइन प्रक्रिया असल्यामुळे पी एम किसान योजनेत आयकर भरणारे शासकीय नोकरदार तसेच निमशासकीय नोकरदार यांचा मोठ्या प्रमाणात समावेश झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पातुर शहरासह तालुक्यातील लाखो रुपयांचा लाभ लाटणाऱ्या गर्भ श्रीमंतांकडून पी एम किसान योजनेअंतर्गत घेतलेली रक्कम शासनाला परत करण्याचे आदेश दिले आहेत तसेच महसूल विभागाला सुद्धा सदरची रक्कम वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.
पातुर तहसील अंतर्गत केवळ नऊ लाख रुपये आतापर्यंत वसूल करण्यात आले आहेत तर अजूनही लाखो रुपये वसुली करण्याचे बाकी आहेत पी एम किसान योजनेमध्ये बोगस गर्भ श्रीमंत लाभार्थी हे विविध राजकीय पक्षाचे पुढारी पदाधिकारी असल्यामुळे महसूल कर्मचारी बोगस गर्भ श्रीमंत लाभार्थ्याकडे किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती सुद्धा देत नाहीत तर केवळ इतकी रक्कम वसुली करण्याचीच माहिती देत आहेत.
बोगस लाभार्थ्यांकडून पी एम किसान योजनेची रक्कम वसुली करताना महसूल कर्मचारी दहशतीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच बोगस गर्भ श्रीमंत लोकांकडून वसुली होत नसल्याची चर्चा सुरू आहे शासनाचे आदेश सदरची रक्कम ताबडतोब वसुली करण्याचे आदेश असताना सदरची रक्कम वसुली करताना विलंब होत आहे मंद गतीने वसुली केली जात आहे ज्या बोगस गर्भ श्रीमंत लाभार्थ्यांनी पी एम किसान योजनेची रक्कम अद्याप पर्यंत परत केली नाही अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पी एम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत नऊ लाख रुपयांची रक्कम वसुली करण्यात आली आहे आणि इतर रक्कम त्वरित वसुली करण्याचे आदेश तलाठी मंडळ अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत -रवी कुमार काळे तहसीलदार पातुर