इमारत बांधकाम कामगार योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी बल्लारपूरात महिला आणी पुरुषांनी एकच गर्दी केली होती.दरम्यान एका महिलेचा गर्दी मुळे श्वास गुदमरल्याने ती गांभीर अवस्थेत रुग्णाल्यात असल्याची माहिती आहे.
निवडणुकीच्या तोंडावर अनेक योजनांची खैरात देऊन युतीचे तिकडी सरकार पुन्हा सत्तेत येऊ बघत आहे.पण योजना जरी प्रभावी असल्या तरी योजना राबविण्याच्या ढिसाळ नियोजन शून्यत्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आज बल्लारपूरात बघायला मिळाले…
बल्लारपूर येथील नाट्य गृहात बांधकाम कामगाराला योजनेतुन मिळणाऱ्या भांडे व अन्य सामुग्रीसाठी जिल्ह्याभरातून नागरिकांना मोठ्या संख्येने पचारण करण्यात आले होते.पण ज्या भाजप नेत्या कडे हे नियोजन होते,तो नेताच सामग्री वाटप ठिकाणी फिरकला नसल्याने गर्दी वाढतच गेली.आज सकाळी 4 वाजे पासून हजारोंच्या संख्येत उपस्थित महिला पुरुषांना आज 8 आक्टोम्बर रोजी काहीच सामग्री मिळाली नाही.
दरम्यान महिलांनी सामुग्रीची मागणी केली.पण कुठले नियोजन नसल्याने तात्कळत असलेल्या नागरिकांचा संताप शिगेला पोहचला.त्यात चेंगरा चेंगरी होऊन एका महिलेचा हात मोडल्याची विश्वासनीय माहिती आहे.मात्र सामुग्री घ्यायला आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची अफ़वा वेगाने पसरली.त्यामुळे उपस्थित नागरिक आणखीनच संतापले…
सायंकाळी 5 वाजूनही सामुग्री न मिळाल्याने तहान भुकेने व्याकुळ नागरिकांनी सामुग्री घेतल्या शिवाय परत जाणार नाही,अशी भूमिका घेतल्याने पोलिसांना हस्तक्षेप करून दंगा नियंत्रण पथकला पाचरण केले.ठाणेदार सुनील गाडे यांनी महिलांना घरी जाण्याची विनंती करूनही उपस्थित नागरिक माघार घेण्यास तयार नव्हते…
एकंदरीत भूक तहानेने व्याकुळ होऊन दिवसभरही काहीच न मिळाल्याने जिल्ह्याभरातून आलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला.महाव्हाईस साठी नरेंद्र सोनारकर,जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर…