रामटेक – राजु कापसे
रामटेक शहर अंतर्गत आंबेडकर वार्ड, नेहरू वार्ड, शनिवारी वार्ड, सुभाष वार्ड, मंगळवारी वॉर्ड व रामटेक तालुका अंतर्गत मौजा भोजापुर, शितलवाडी, करवाही, चिचदा, पुसदा पुनर्वसन 1, पवनी, उदापूर, शिवनगर कॉलनी परसोडा, गुरुकुल नगर परसोडा तसेच मौदा तालुका अंतर्गत गांगणेर व हिवरा या गावातील अनेक युवक, महिला व जेष्ठ लोकांनी मा.श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश घेतला.
अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाची वाढती लोकप्रियता आणि मा.श्री राजेंद्रजी मुळक यांचे नेतृत्व, संघटन कौशल्य आणि काम पाहून तालुक्यात काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आगामी काळात काँग्रेस पक्ष मोठी उभारी घेऊन देशातील नंबर एकचा पक्ष होईल या विश्वासाने पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधीकारी तसेच कार्यकर्त्यांचे यावेळी मा.श्री.राजेंद्रजी मुळक यांनी स्वागत केले तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रत्येक अडचणीत संपूर्ण शक्तीने मदत करण्याचे वचन देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…
यावेळी श्री. दामोधर धोपटे (अध्यक्ष, रामटेक शहर काँग्रेस कमिटी), श्री. तुलारमजी मेंढे, श्री. बाळकृष्ण खंडाईत (माजी संचालक कृ.उ.बा. समिती रामटेक मौदा), श्री. ताराचंद धनरे (अध्यक्ष, रामटेक शहर ओबीसी विभाग), श्री. अभिषेक डाहारे (अध्यक्ष, रामटेक तालुका असंघटित कामगार विभाग), श्री. शैलेंद्र नागपुरे (अध्यक्ष, रामटेक शहर असंघटित कामगार विभाग),
श्री. वसंता दुंडे, श्री. अरुण फुले, श्री. श्रीधर वाघमारे, श्री. किशोर सायरे, श्री. अक्षय खंडाईत, श्री. हिमांशू चांदेकर, श्री. अशोक हांडे, श्री. जीवन राऊत, श्री. वासुदेव तेलरांदे, श्री. रोहित ढोके, श्री. मनोहर वांढरे, श्री. तुकाराम राहाटे,श्री. आदित्य चांदेकर, श्री. अभय उईके, श्री. रुपेश आष्टणकर, श्री. करण गाडेकर, श्री. प्रीतम तुमडाम,
श्री. आकाश बमचर, श्री. शुभम पंधरे, श्री. अशोक हटवार, श्री. प्रणव मेश्राम, श्री. सुमित उईके, श्री. प्रतीक बदल, श्री.प्रांजल इंगळे, श्री. मयूर कार, श्री. सतीश चांदेकर, श्री. योगेश बोरीवार, श्री. प्रणय चांदेकर, श्री. गणपत आष्टणकर, श्री.राजू मडावी,
सौ कविताताई चांदेकर, सौ. सुनिता नाचणकर, सौ. सारिका आष्टणकर, सौ. जिजा येवले, सौ. जयश्री आष्टणकर, सौ. जयश्री गजभिये, सौ. यशोदा गजभिये, सौ. गंगाबाई चांदेकर इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी गण उपस्थित होते.