Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingसमतादुतांच्या कार्यशाळेत बार्टी महासंचालक व अधिकारी कर्मचारी ह्यांचा बेभान डान्स...व्हिडीओ व्हायरल...

समतादुतांच्या कार्यशाळेत बार्टी महासंचालक व अधिकारी कर्मचारी ह्यांचा बेभान डान्स…व्हिडीओ व्हायरल…

ह्या सर्व नाच्या ना निलंबित करा…राजेंद्र पातोडे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यासह बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वारे समतादुतांच्या कार्यशाळेत बेभान डान्स करत असल्याची चित्रफीत व्हायरल झाली आहे. हा प्रकार अतीशय गंभीर आणि निंदाजनक असून ह्या ‘नाच्यानी’ बाबासाहेबांच्या नावावरच्या वास्तूचा डान्सबार केला असून ह्या सर्वांना निलंबित करा अशी मागणी वंचित बहूजन युवा आघाडी ने केली आहे.

बार्टीच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असताना, बार्टीच्या महासंचालकांकडून गोविंद, बोलो, हरि गोपाल बोलो या गाण्यावर बेभान नृत्य केल्याची चित्रफीत सर्वत्र फिरत आहे. विशेष म्हणजे राज्यभरातून आलेल्या समतादुतांनादेखील बेभान डान्स करायला लावल्याचे यात दिसत आहे. समतादुतांच्या या कार्यशाळेचा उद्देश त्यांना भारतीय संविधानांचा अभ्यास आणि महामानवांच्या विचाराने त्यांना प्रेरित करून प्रशिक्षित करणे हा होता. मात्र या विभागात मनमानी सुरू असून, त्याचाच कित्ता महासंचालकांनी गिरवत, बेभान डान्स केल्याचे समोर आल्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची पुष्टी महाव्हाईस न्यूज करीत नाही…

समतादूत म्हणून पुढील कामे करणे आवश्यक आहे. त्यामध्ये 1. राज्य घटने मधील नमूद न्याय, स्वातंत्र्य, एकात्मता, समानता ही मुलभूत तत्वे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे.

  1. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणे व लाभार्थी मिळविणे.
  2. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 बाबत जाणीव-जागृती करणे.
  3. बार्टीच्या विविध उपक्रम/योजनांची माहिती जनसामान्यात पोचवणे.
  4. समाजातील वंचित आणि दुर्बुल घटकातील अनुसूचित जाती च्या लोकांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकस्तर उंचावणे.
  5. अनुसूचित जातीतील विविध जातीच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सध्यस्थितीचा संशोधन अभ्यासासाठी संशोधन व मूल्यमापन कार्यासाठी माहिती संकलित करणे.
  6. जातीय दुर्भावना नष्ट करण्याचा प्रयत्न करुन सामाजिक सलोखा व बंधुभाव निर्माण करणे.
  7. थोर समाज सुधारक, सम्राट, तसेच संत परंपरा आणि तथागत बुध्द यांची समतेविषयक शिकवण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रबोधन करणे.
  8. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व लाभार्थी यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणे.
  9. सातत्य पुर्ण व शास्वत विकासासाठी समता सेवक व युवा केंद्राच्या माध्यमातुन प्रयत्न करणे.
  10. अंधश्रध्दा निर्मुलन जनजागृती करुन वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविणे या विषयावर प्रबोधन कार्यक्रम घेणे.
  11. विविध क्षेत्रातमध्ये प्रचलित असलेली सामाजिक समता या विषयी अभ्यास करुन सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणाम कारक होण्यासाठी प्रयत्न करणे.
  12. बार्टीअंतर्गत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा Social Media व इतर ऑनलाईन माध्यमातून प्रचार व प्रसार करुन बार्टीच्या उद्देशपुर्तीसाठी कार्य करणे.
  13. समतादूतांना उद्योजकता विकास विषयक प्रशिक्षण देऊन प्रशिक्षक (मास्टर ट्रेनर) बनविणे.ह्याचा समावेश होतो.तर वसंत हंकारे हे ताणतणाव कमी करण्यासाठी सदर एकटीव्हिटी घेतात असा निर्लज्ज खुलासा बार्टी चे स्थानिक अधिकारी करीत आहेत
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: