भंडारा – सुरेश शेंडे
बसवर कर्तव्य क्रमानुसार लावण्याच्या कारणावरून एका चालकाच्या छातीवर बसून वाहन अधिकारी बेदम मारहाण करण्याचा विडीयो साकोली व परिसरात सोशल मिडीयातून चांगलाच व्हायरल झाला आहे.
याप्रकरणी कामात ढवळाढवळ करणा-या व चालकाला बेदम मारहाण करणा-या वाहन परीक्षक प्रदीप करंजेकर यांची बदली इतरत्र करावी.अशी मागणी केली असून साकोली आगारात दिवाळीपूर्वी हा चांगलाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
शुक्रवार १८ ऑक्टोंबरला सायंकाळी ४:१५ वाजे दरम्यान साकोली बसस्थानक येथे आगार प्रवेशद्वारा समोरच वाहन परीक्षक प्रदीप करंजेकर हे चालक पंकज काटनकर रा. उमरी/लवारी(साकोली) यांच्या छाताडावर बसून अश्लील शिव्या देत बेदम मारहाण करीत असल्याचा विडीयो शहरातील विविध( सोशल मिडीया) समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत स्वतः आगार व्यवस्थापक सचिन आगरकर तसेच एक महिला अधिकारी,वाहतुक नियंत्रक एकनाथ शहारे,कुणाल लिखार आणि सुरक्षा कर्मचारी हे सुद्धा दिसत आहेत.चालक पंकज काटनकर हे त्यांची बससेवा फेरी कामगिरी व्यवस्थित का लावत नाही?म्हणून हा वाद विकोपाला गेला होता.
अशा प्रकारचा वादविवाद या आगारात मागील दिड वर्षांपासून सुरू आहे. या घटनेत चालक पंकज काटनकर यांच्या गुद्दद्वारावर मार लागला असून हातापायाला दांडक्याने बेदम मारहाण झाली आहे.घटनेतील जखमी चालक पंकज काटनकर हे हाडांचे “क्ष-किरण”अहवाल रूग्णालयून घेऊन या प्रकरणी पोलीस तक्रार करणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.
या गंभीर विषयी आता चालक वाहकांनी अशा इतरांच्या कामात ढवळाढवळ करून कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणा-या व मारहाण करणाऱ्या अधिका-याची तातडीने साकोली आगारातून बदली करावी व चालकाला मारहाण करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.