रामटेक – राजू कापसे
पावसाळा सुरु झाला त्यामुळे सापांच्या बिळात पाणी शिरल्याने ते आपल्यासाठी वातावरणानुसार पोषकस्थळी आश्रय घेतात, मग ते शेतशिवार असो किंवा कुणाचे घर जनावरांचा गोठा मात्र अशावेळी साप विषारी असो किंवा बिनविषारी तो दिसताच नागरिक भयभीत होतात जिल्ह्यात विषारी सापांच्या जाती बोटावर मोजक्याच आहेत.
परंतु नागरिकातर्फे माहितीच्या अभावात साप विषारी असो किंवा बिनविषारी, प्रत्येकच सापाचा बळी घेतला जातो. निसर्गाचा जीवनचक्र राखण्यासाठी साप वाचविणे गरजेचे आहे. तसेच वन्यजीवांना संरक्षण देणारा कायदा 1972 मध्ये अंमाणात आला. या कायद्यानुसार सापांनाही संरक्षण मिळाले आहे. सापांना मारणे हे कायद्याने गुन्हा आहे. साप दिसताच त्याला वाचविण्यासाठी सर्पमित्रांना मदत करा.
जिल्लात नाग. घोणस.मन्यार फुरसे यां सापांच्या मुख्य विषारी 4 जाती आहे तसेच हरणटोळ मांजन्य,फोस्टेन निविषारी/अर्थ विषारी सापांमध्ये समावेश होतो. तसेच नानेटी, धूडनागीण, दिवड, तस्कर, कुकरी, दुरक्या घोनस, धामण, अजगर हे सर्व बिनविषारी साप आहेत.
मार्च व एप्रिल हे दोन महिने सापांच्या मिलनाचा काळ असतो. मे महिन्यात साप अंडी घालत असतात साप दिसता की घाबरून न जाता जवळील वनविभागाशी (टोल फ्री 1926) किंवा वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक सर्प मित्रनां संपूर्ण साधावा.असे आवाहन केले आहे. रामटेक सर्पमित्र नंबर राहुल कोठेकर 9527712101 अजय मेहरकुळे 9028427076