नांदेड – महेंद्र गायकवाड
शहरातील वाढत्या रहदारीमुळे व गाडी पार्किंग व्यवस्थित न लावत असल्यामुळे नागरिकांना अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलिसांनी शहरात टोइंग व्हॅनची कारवाई सुरु केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनावर व चालकावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
शहरामध्ये सण उत्सव व वाढती रहदारीमुळे वारंवार होणारी रहदारीस अडथळा त्यामुळे नागरीकांचा नाहक त्रास टाळण्यासाठी व गर्दी कमी करण्यासाठी नागरीकांनी आपले वाहन थांबवते वेळी व पार्कीग करते वेळी रहदारीस अडथळा होणार नाही.व जनतेस त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपले वाहन थांबवावे असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
जे वाहनचालक वाहनांच्या नियमांचे पालन न करता आपले वाहन अस्थावेस्त व रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी लावतील तर नांदेड पोलीसांकडुन त्यांचे वाहण टोइंग करण्यासाठी टोइंग व्हॅनची सुरूवात करण्यात आली आहे. नियमाचे पालन करणार नाही त्या वाहनावर व चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.