पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यांतील गट ग्राम पंचायत पांढुणाॅ सोनुना येथील गावकऱ्यांनी गट विकास अधिकारी यांचे दालनामध्ये सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य सह गावकारी मंडळींनी चक्क गट विकास अधिकरी यांचे दालनामध्ये आमरण ठिया आंदोलनं केले. तोच जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल फाटकर विनोद देशमुख जिल्हा परिषद सदस्य सभापति उपसभापति यांनी सुद्धा गट विकास अधिकारी यांचे दालनामध्ये गवकऱ्या सोबत आंदोलनांमध्ये ठीया सहभागी झाले जो पर्यंत ग्राम सेविका यांची बादली होत नाहीं तो सर्व या मागणीवर ठाम राहिले आहेत.
मागिल पाच वर्षांमध्ये गावातील पाच वर्षा मध्ये गावातीलच कित्तेक लोकांनी ग्राम सेवक यांनी भ्रष्टचार केल्याच्या तक्रार केल्या आहेत. मात्र गट विकास अधिकारी यांनी आर्थ पूर्ण दूर लक्श करून कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही वारंवार गटविकास अधिकारी यांच्याकडे गावकरी तक्रार करत राहिले मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याने गावकऱ्यांनी शेवटी ग्रामसेवक विरोधात दोन दिवस अगोदर याच कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले.
दोन दिवसांमध्ये बदली न केल्यास त्यानंतर आमरण ठिय्या करून असे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात गावकऱ्यांनी सांगितले मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता शेवटी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सहा गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्या धरणामध्ये आमरण आंदोलन करण्याचे चालू केले आहे चालूकेलें आहे.
गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्याकडे सदर ग्रामसेवकाची एक ते 33 व संपूर्ण खाते न्याय चौकशी करण्याची तक्रार केली होती तोच जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी गटविकास अधिकारी यांना एक ते 33 व पूर्ण खातीनिहाय चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
मागील अनेक महिन्यापासून सरपंच उपसरपंच व गावकरी यांनी ग्रामसेवक यांची बदली करण्यात यावी अशा प्रकारचे अनेक तक्रारी कार्यालयामध्ये दिल्या मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आंदोलनाचा पवित्र गावकऱ्यांनी घेतला
ग्रामसेवकांनी अनेक लोकांवर केले खोटे गुन्हे दाखल
पांढुणाॅ सोनुना येथील ग्रामसेवक यांच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रकारचे खोटे गुन्हे दाखल लोकांवर दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये 353 354 ॲट्रॉसिटी 324 इत्यादी प्रकारचे गावकऱ्यावर माहिती विचारली असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सुद्धा ग्रामपंचायतची माहिती विचारली असता तक्रार केली असता खोटे गुन्हे दाखल केले म्हणून गावकरी ग्रामसेवक यांच्या मानसिक त्रासाला पूर्ण कंटाळून गेले आहेत कोणतीही माहिती विचारल्यास त्यांना दमदाटी केल्या जाते व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमक्या दिल्या जातात त्यामुळे सदर ग्रामसेविकामुळे गावचा पूर्ण विकास कोळंबला आहे सदर ग्रामसेविकामुळे गावचे लोक भीतीच्या वातावरणामध्ये राहत आहेत.
कोणताही दाखला मागितला तर आपल्याला गुन्हा तर दाखल होणार नाही ना त्या प्रकारे लोक गावामध्ये चर्चा करत आहेत म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पूर्ण प्रकारची चौकशी करून यांची बदली करण्यात यावी व पूर्ण चौकशी करून यांना निलंबित करण्यात यावे अशी पूर्ण गावातील लोकांच्या वतीने माननीय पालकमंत्री ग्राम विकास मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी अकोला व विभागीय आयुक्त अमरावती आयुक्त अमरावती मुख्य सचिव मंत्रालय तक्रार करण्यात आली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल फाटकार विनोद देशमुख जिल्हा परिषद सदस्य सभापती व प स पातूर उपसभापती पसंत पातुर यांनी सुद्धा गावकऱ्यांना न्याय मिळावा व गावकरी भीतीच्या वातावरणामध्ये जगू नये गावकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल होऊ नये याकरिता गावकऱ्यासोबत ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत कार्यालयात उठणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली