Monday, December 23, 2024
HomeSocial TrendingBCCI सचिव जय शहा 'या' कृतीमुळे सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल…व्हायरल Video पाहून...

BCCI सचिव जय शहा ‘या’ कृतीमुळे सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल…व्हायरल Video पाहून महिलाही संतापल्या…

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलचा नवा चॅम्पियन बनला आहे. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गुजरात टायटन्सचा पाच विकेट्सने पराभव केला. CSK जिंकल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या सामन्यादरम्यान BCCI सचिव जय शहा यांचाही एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनेक नेटकरी अश्लील हावभाव करत असल्याचे म्हटले आहे.

काय घडलं?
गुजरातचा विजय जवळ आला तेव्हा जय शहा हे अत्यंत खुश दिसत होते. यामध्ये ते उड्या मारताना दिसले, नंतर 3 चेंडूत 11 धावा करायच्या होत्या आणि चेन्नईचा विजय अवघड दिसत असतानाच जय शहा यांनी प्रतिस्पर्धीला हातवारे करून ही प्रतिक्रिया आली.

शेवटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी 13 धावांची गरज होती. गुजरातचा कर्णधार हार्दिकने मोहित शर्माला गोलंदाजीसाठी बोलावले. त्याच्या पहिल्या चार चेंडूत तीन धावा झाल्या. यानंतर CSK ला शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज होती. रवींद्र जडेजा स्ट्राइकवर होता. जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: