सांगली – ज्योती मोरे
कर्नाटकातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत असताना खास बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, परिसर मिरजेतील माजी सैनिक वसाहतीसह बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या बाजूच्या बोळातून शांताराम बसवंत शिंदे वय वर्षे सत्तावीस राहणार असंगी तुर्क तालुका जत जिल्हा सांगली,
सौरभ रवींद्र कुकडे वय वर्षे 24 राहणार दत्तनगर गोल्डन कॉलनी करणार रोड सांगली, राहुल सतीश माने वय वर्षे 30 राहणार वसंत दादा हाऊसिंग सोसायटी माजी सैनिक वसाहत मिरज, वैभव राजाराम आवळे वय वर्षे 25 राहणार हडको कॉलनी गणपती मंदिराजवळ शंभर फुटी रोड मिरज,
सुरेश लक्ष्मण राठोड वय वर्षे 42 राहणार आलियाबाद हंचनाळ तांडा एलटी नंबर एक तालुका विजापूर जिल्हा विजापूर आणि सुरज संभाजी महापुरे वय वर्षे 25 सरकारी दवाखान्याजवळ दिघंची तालुका आटपाडी या आरोपींना आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकत्रितपणे प्रत्येकी साठ हजार रुपये किमतीची सहा तर ५० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल सतरा करतोस आणि निट्रोसम दहा एमजीच्या 228 गोळ्या मोबाईल गुन्ह्यात वापरलेले स्विफ्ट डिझायर गाडी असा एकूण नऊ लाख 67 हजार 25 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, संजय कांबळे,सुधीर गोरे, सुनील चौधरी ,राजू शिरोळकर ,अमोल ऐदाळे, मच्छिंद्र बर्डे, संदीप पाटील, राहुल जाधव, संकेत मगदूम, अजय बेंद्रे,
गौतम कांबळे ,संकेत कानडे, संतोष गळवे, ऋषिकेश सदामते ,आर्यन देशींगकर, कॅप्टन गुंडवाडे, विमल नंदवाळे,ज्योती चव्हाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, निलेश कदम, मेघराज रुपनर,दीपक गायकवाड, सचिन धोत्रे, नागेश खरात, सुनील लोखंडे, संदीप नलावडे, चेतन महाजन, प्रकाश पाटील, प्रियांका धुमाळ, वनिता चव्हाण आदींनी केली.