Bangladesh Girlfriend : पाकिस्तानची सीमा हैदर भारतात आल्यापासून बाहेर देशातील प्रेमिका भारतात येण्याचे आणि जाण्याचे प्रमाण फार वाढले आहे. असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे, बांगलादेशातील एक महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी मध्यप्रदेशातील मुंगराबादशाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गरियाव गावात आली आहे. टुरिस्ट व्हिसावर आलेली तरुणी 15 दिवसांपासून प्रियकराच्या घरी थांबली होती. तर प्रियकर फरार झाला आहे. याची माहिती मिळताच प्रशासनाने तपास सुरू केला आहे.
पोलीस आणि तपास यंत्रणा महिलेच्या सुरक्षेबाबत आणि इतर कामांची माहिती घेत आहेत. बांगलादेशातील मुन्शीगंज जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावातील फातिमा अख्तर आणि गरियांव येथील अशफाक अहमद हे दुबईत नोकरीनिमित्त राहत होते. या दोघांची दोन वर्षांपूर्वी दुबईत भेट झाली होती.
फातिमाच्या म्हणण्यानुसार दोघेही तिथे एकत्र राहू लागले. दोघांचे लग्नही झाले आहे. काही महिन्यांपूर्वी हे दोघेही आपापल्या देशात परतले होते. १५ दिवसांपूर्वी फातिमा प्रियकर अश्फाकला भेटण्यासाठी सहा महिन्यांचा टुरिस्ट व्हिसा घेऊन गरियाव येथे आली होती.
अश्फाकच्या घरी गेली असता तो घरी सापडला नाही, तर तिने 15 दिवस त्याच्या घरी मुक्काम केला तरी मात्र तो परत आला नाही. असे पोलीस स्टेशनचे प्रमुख संजय वर्मा यांनी सांगितले की, बांगलादेशी महिला आल्याची माहिती मिळाली आहे. ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी कायदेशीररित्या आली आहे. त्याबाबत अधिक ठोस माहिती मिळवली जात आहे. गेल्या 15 दिवसांपासून ती तिच्या प्रियकराच्या घरी राहत होती.