सांगली – ज्योती मोरे.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे देशासह राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्याला लोकशाही मार्गाने विरोध करून निषेध व्यक्त केला जाईल,भारत देशामध्ये विविध जाती-धर्माचे व पंथाचे लोक गुण्या-गोविंदाने राहत असताना निव्वळ प्रसिद्धि साठी व आर्थिक हिताकरिता समाजामध्ये चुकीचे संदेश चित्रपटाद्वारे देण्याचा हेतू आहे.
निव्वळ मुस्लीम समाजाला लक्ष्य करून,मुस्लीम समाजाबद्दल व धर्माबद्दल द्वेष,मत्सर,हेवा व घृणा हेतूपुरस्कर चित्रपराद्ववारे पसरवला जात आहे.अशा चित्रपट निर्मात्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
देशाला चांगल्या वास्तववादी,विवेकवादी मनोरंजना सह इतर चित्रपटाची गरज असताना.काल्पनिक चित्रपट निर्माण करून समाजा समाजामध्ये दुफळी द्वेष निर्माण करणारे चित्रपट निर्माण करुन देशात अशांतता व दंगे घडवण्याच तसेच लोकांना उत्तेजित करून रस्त्यावर उतरणेस भाग पाडणारा हा चित्रपत दिसतोय.
देशातील वातावरण ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे दूषित होण्याची दाट शक्यता आहे.देश,राज्य व शहरांच हित लक्षात घेऊन हा चित्रपट कोणत्याही चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित करू नये.
“द केरला स्टोरी” या चित्रपटामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास निर्मात्यापासून कलाकारसह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीना मिरज प्रांताद्वारे निवेदन देण्यात आले यावेळी मिरज प्रांत ऑफिसचे नायब तहसीलदार नारायण मोरे साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.
या वेळी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे मिरज शहर अध्यक्ष वसीम शेख,बहुजन समाजवादी पार्टीचे मिरज शहर अध्यक्ष सलीम अत्तार,सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख,साद गवंडी व नासिर शेख सह कार्यकर्ते उपस्थित होते.