Saturday, December 21, 2024
HomeMarathi News Todayनांदेड जिल्ह्यात श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध...

नांदेड जिल्ह्यात श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यात श्री गणेश उत्सव 7 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत डॉल्बी सिस्टीम मालक, चालक, इतर कोणत्याही व्यक्तीस डॉल्बी सिस्टीम वापरात / चालविण्यास भारतीय सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढला आहे.

जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार 7 ते 19 सप्टेंबर रोजी श्रीचे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक / चालक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी. हा आदेश 7 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते 19 सप्टेंबर 2024 रोजी 24 वाजेपर्यंत श्रीचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील,

डॉल्बीचे आवाजामुळे व कंपनामुळे लहान मुले, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच आजारी व सामान्य नागरीक यांच्या कानास, ऱ्हदयास आरोग्यास,जिवितास धोका होण्याची तसेच सामाजिक स्वास्थ बिघडण्यास व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी मालक / चालक यांचेवर बंदी घालण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद केले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: