चंद्रपूर (नरेंद्र सोनारकर):
बल्लारपुर पोलीसांनी शहरातील गुंड प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी विशेष मोहिन सुरु केली आहे.याबाबत उल्लेखनीय कामगिरी अशी की, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ चे सायंकाळी ७ चे सुमारास सुभाष वार्ड येथील जोक्कू नाल्याजवळ राहणारा हिरा बहुरीया हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने तलवार बाळगुण आहे अशी मुखबिर व्दारे खबर मिळाल्याने या बाबत शहानिशा करण्यासाठी पंचासह पोलीस स्टॉफ रवाना होवून संबंधित आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरातुन खालील वर्णनाची एक लोखंडी तलवार एकुण लांची-८० सेमी असून मुठपात्याची लांबी-७० सेमी आहे व पात्यापासुन लाकडी मुठीची लांबी १० सेमी पात्याची रुंदी मध्यभागी २.५ सेंमी असून समोर टोकदार धार असलेली ही तलवार आहे.तलवारीची अंदाजित किमत ५०० रुपये आहे. तलवार मिळून आल्याने आरोपीत नामे हिरा ईश्वर बहुरीया चय-४१ वर्षे, रा. सुभाष वार्ड, जोक्कु नाला बल्लारपुर जि. चंद्रपुर याला ताब्यात घेवुन कलम-४,२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. सुनिल वि. गाडे, सपोनि. दिपक कांक्रेडवार, पोउपनि. हुसेन शहा, सफौ. गजानन डोईफोडे, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं. अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे.
तसेच ईद आणि गणपती दरम्यान यापूर्वीही विषेश मोहीम राबवून शहरातील वेगवेळ्या भागातून आतापर्यंत ६ तलवारी जप्त करून आरोपींवर कार्यवाही करण्यात आली आहे.